Goa: ‘लोकमान्य’च्‍या मडगाव शाखेचे आज स्थलांतर

गोमंतकीयांचा ‘लोकमान्य मल्टिपर्पज’ को-ऑप सोसायटीवर (lokmanya multipurpose cooperative society) नितांत विश्वास ठेवला आहे.
Goa: ‘लोकमान्य’च्‍या मडगाव शाखेचे आज स्थलांतर

मडगाव: लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटीच्या (Lokmanya Multipurpose Co-op Society) मडगाव (Margao) शाखेचा नवीन वास्तूत स्थलांतर सोहळा २८ जून रोजी आयोजित केला आहे. पौलिनो बिल्डिंग, पॉप्युलर हायस्कुलजवळ, कोंब - मडगाव येथे शाखेचे स्थलांतर होत आहे. सध्‍याच्या कोविड परिस्थितीमुळे स्थलांतर अतिशय साध्या पद्धतीने होणार आहे. मडगाव शाखा ही ‘लोकमान्य मल्टिपर्पज’ सोसायटीच्या प्रमुख शाखांमध्ये समाविष्ट असून 2007 पासून गोमंतकीयांच्‍या सेवेत कार्यरत आहे. (The Lokmanya Multipurpose Co-op Society will be relocated)

गोमंतकीयांचा ‘लोकमान्य मल्टिपर्पज’ को-ऑप सोसायटीवर नितांत विश्वास ठेवला आहे आणि ह्या विश्वासाला जपत लोकमान्य व गोमंतकीयांचे नाते अधिक समृद्ध झाले आहे. लोकमान्य सोसायटीची मडगाव शाखा सर्व आधुनिक सोयींनी सुसज्ज असून ह्या शाखेत सुरक्षित लॉकर सुविधा उपलब्ध आहे. वीज बिल भरणा, टेलिफोन बिल भरणा, एलआयसी विमा, आरोग्य विमा व इतर विमा सेवा देण्यात येणार आहेत. लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटी मडगाव शाखा ही महत्त्‍वाची शाखा असल्याने भविष्यात सोने तारण कर्जसुविधा व परकीय चलन देवाण - घेवाण सेवा व इतर महत्त्‍वाच्या सेवा उपलब्‍ध करणार आहे.

Goa: ‘लोकमान्य’च्‍या मडगाव शाखेचे आज स्थलांतर
Goa vaccination : राज्य कोरोना मुक्त करण्याचे ध्येय

‘लोकमान्य मल्टिपर्पज’ को-ऑप सोसायटी ही देशातील अग्रगण्य सहकारी संस्था आहे व 213 शाखा गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक व राजधानी दिल्ली येथे कार्यान्वित आहेत. गोव्यात 49 शाखांचे कार्य अतिशय जोमात सुरू असून अखंड ग्राहक सेवा सुरू आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com