गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी युतीची दुरावस्‍था

उमेदवारांची अनामत रक्कम जप्त: अनेक ठिकाणी ‘नोटा’पेक्षाही कमी मते
Shiv Sena and NCP
Shiv Sena and NCPDainik Gomantak
Published on
Updated on

मिलिंद म्हाडगुत

फोंडा: महाराष्ट्राच्या धर्तीवर शिवसेनेने गोव्यातही राष्ट्रवादीशी युती करुन रिंगणात उडी घेतली होती. वास्तविक सेनेला राष्ट्रवादीबरोबरच कॉँग्रेसशी युती करून महाविकास आघाडी स्थापन करावयाची होती. पण कॉँग्रेसने नकार दिल्यामुळे सेनेला राष्ट्रवादीच्या युतीवरच समाधान मानावे लागले. यावेळी गोव्याच्या विधानसभेत सेनेचा आमदार असणारच अशी सेनेचे खासदार व गोव्याचे प्रभारी संजय राऊत यांनी शेखी मारली होती. पण आमदार सोडाच सेनेच्या उमेदवारांना आपली अनामत रक्कमही वाचविता आली नाही.

Shiv Sena and NCP
Goa Government: माविन, विश्वजीत, काब्राल यांची मंत्रिपदे निश्चित

हळदोण्‍यातून शिवसेनेतर्फे लढलेले गोविंद गोवेकर यांनी घेतलेली 250 मते ही सेनेची सर्वाधिक मते ठरली. म्हापशातून रिंगणात उतरलेले गोवा सेनेचे प्रमुख जितेश कामत यांना तर फक्त 126 मते प्राप्त झाली. अनेक उमेदवारांना 66, 99 अशी दोन अंकी मते मिळाली आहेत. यावरून सेनेची गोव्यातील दुरावस्‍था अधोरेखित होते. सेनेने एकूण 11 उमेदवार रिंगणात उतरविले होते आणि या अकराही उमेदवारांचे या निवडणुकीत पानिपत झाले.

शिवसेनेचा आलेख खालावलेलाच

राष्ट्रवादीचे यापूर्वी उमेदवार निवडून आले असले तरी ते स्वबळावर निवडून आले होते. चर्चिल आलेमाव हे याचे जिवंत उदाहरण. सेना मात्र इतकी वर्षे होऊनही गोव्यात रुजू शकली नाही. 1994 साली अशी संधी आली होती. त्यावर्षी सेनेचे दिलीप कळंगुटकर यांनी साळगावात माजी मुख्यमंत्री विली डिसोझा यांना चांगलीच टक्कर दिली होती आणि ते जिंका जिंकता थोड्या फरकाने हरले होते. पण त्यानंतर सेनेचा आलेख खालावतच गेला. राष्ट्रवादीही आता सेनेच्या मार्गावरच चालली आहे. शिरोड्यात डॉ. सुभाष प्रभुदेसाई यांना 576 तर मडकईत रवींद्र तळावलीकर यांना फक्त 140 मते मिळाली. जर राष्ट्रवादी व सेनेला गोव्यात पाय रोवायचे असतील तर त्यांनी आतापासून बांधणीवर लक्ष द्यावा लागेल.

Shiv Sena and NCP
देशातील सुंदर ठिकाणी एंजॉय करा होळीची सुट्टी

पक्षश्रेष्‍ठींचे गोव्‍याकडे झाले दुर्लक्ष

राष्ट्रवादीचीही तीच स्थिती दिसून आली. मागच्या वर्षी चर्चिल आलेमाव यांच्या रुपात विधानसभेत राष्ट्रवादीला एक तरी आमदार होता. यावेळची विधानसभा राष्ट्रवादीविना दिसणार आहे. या पक्षातर्फे माजी मंत्री फिलिप नेरी रॉड्रिगीस, मिकी पोशेको, जुझे फिलिप डिसोझा असे अनेक मातब्बर रिंगणात उतरले होते. राष्ट्रवादीने एकूण 13 उमेदवार रिंगणात उतरविले होते. त्यापैकी बारा उमेदवारांना आपली अनामत रक्कम गमवावी लागली. या दुर्दशेचे मुख्य कारण म्हणजे दोन्‍ही पक्षांच्‍या श्रेष्ठींची गोव्याकडे असलेली अनास्था. सेना गोव्‍यात फोफाऊ शकली नाही. यामागे हेच कारण आहे. महाराष्ट्रात सेना सत्तेवर असतानाही गोव्यात तिचा का विस्तार होऊ नये यामागे श्रेष्ठींची अनास्था हेच कारण द्यावे लागेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com