Goa Rape Case: बलात्कारप्रकरणी शिवप्पा लमाणीला जामीन नामंजूर

संशयित विवाहित असतानाही त्याने अल्पवयीन मुलीवर केलेला लैंगिक शोषणाचा गुन्हा गंभीर स्वरुपाचा आहे, असे निरीक्षण आदेशात करण्यात आले आहे.
Court
Court Dainik Gomantak

अल्पवयीन मुलीवरील बलात्कारप्रकरणी खटला सुरू आहे, त्यामध्ये प्रथमदर्शनी आतापर्यंत सादर केलेल्या पुराव्यांनुसार संशयित शिवप्पा सोमण्णा लमाणी गुन्ह्यात गुंतला असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे तो दोन वर्षाहून अधिक काळ कोठडीत असला तरी त्याला जामीन देणे योग्य होणार नाही असे निरीक्षण करत मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने त्याचा जामिनाचा अर्ज फेटाळला.

Court
Accident News: बांबोळी उतरणीवरील वळण मृत्यूचा सापळा !

संशयिताविरुद्धचा डीएनए चाचणी अहवाल नकारात्मक आला असला तरी याक्षणी त्याच्या आधारावर त्याला जामीन देणे योग्य वाटत नाही. खटला प्रलंबित आहे त्यामुळे न्यायालय योग्य तो निर्णय देईल. संशयित विवाहित असतानाही त्याने अल्पवयीन मुलीवर केलेला लैंगिक शोषणाचा गुन्हा गंभीर स्वरुपाचा आहे, असे निरीक्षण आदेशात करण्यात आले आहे.

विवाहित संशयित शिवप्पा याने शेजारी राहत असलेल्या १५ वर्षीय मुलीचा गैरफायदा घेऊन अत्याचार केले. तिची मासिक पाळी चुकल्याने तिला पालकांनी तपासणीला डॉक्टरकडे नेले तेव्हा ती गरोदर असल्याचे उघड झाले. त्यामुळे पालकांनी पोलिसांत तक्रार दिली होती. संशयिताला १ डिसेंबर २०२० रोजी अटक झाली. याप्रकरणी पोलिसांनी संशयिताविरुद्ध आरोपपत्र सादर केले आहे.

Court
Goa Mining : खाण अवलंबितांना ‘बाप्पा पावला’; 177 कोटी मंजूर

संशयित लमाणी हा १७ डिसेंबर २०२० पासून कोठडीत आहे. त्याला खोटी तक्रार दाखल करून गुन्ह्यात गंुतवले आहे. सुनावणी संथ सुरू असून पीडितेची जबानी घेण्यात न्यायालयाने ५ महिने लावले. तिने पोलिस व न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर दिलेल्या जबानीत तफावत आहे, अशी बाजू संशयिताच्या वकिलांनी मांडली.

संमती असली तरी, तो गुन्हाच !

या आरोपपत्रात १९ साक्षीदार आहेत. पीडितेने तक्रारीत संशयितांचे नाव नमूद केले आहे. त्याने केलेला गुन्हा गंभीर आहे. लैंगिक शोषण हे मुलीच्या संमतीने झाले असले तरी अल्पवयीन मुलींच्या बाबतीत संमती असली तरी कायद्याने तो गुन्हा ठरतो, अशी बाजू सरकारी वकिलांनी मांडली. डीएनए अहवाल नकारात्मक असला तरी नमूना घेण्यात त्रुटीची शक्यता आहे. त्यामुळे संशयिताला जामीन देऊ नये, अशी बाजू पीडितेच्या वकिलांनी मांडली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com