Saint Francis Xavier Exposition: नोव्हेनाच्या पहिल्याच दिवशी अलोट गर्दी! जुने गोवेत 1 लाख भाविक; अजून आकडा वाढणार

St. Francis Xavier exposition attracts massive crowd: २१ नोव्हेंबर रोजी शवप्रदर्शन सुरू झाल्यानंतर २२ आणि २३ रोजी सुमारे ८० हजार भाविक दर्शनासाठी आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे, परंतु आज नोव्हेनाच्या पहिल्याच दिवशी सुमारे १ लाख भाविक जुने गोवे येथे पोहोचले.
Saint Francis Xavier Exposition
Saint Francis Xavier ExpositionDainik Gomantak
Published on
Updated on

SFX Exposition Old Goa 2024

तिसवाडी: सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या नोव्हेनांना आजपासून सुरवात झाली असून पहिल्याच दिवशी भाविकांची अलोट गर्दी झाली. नोव्हेना आणि शवप्रदर्शन सोहळा, त्यात रविवार असल्याने हजारो भाविक जुने गोवेत पोहोचल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. येणाऱ्या दिवसांमध्ये हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

२१ नोव्हेंबर रोजी शवप्रदर्शन सुरू झाल्यानंतर २२ आणि २३ रोजी सुमारे ८० हजार भाविक दर्शनासाठी आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे, परंतु आज नोव्हेनाच्या पहिल्याच दिवशी सुमारे १ लाख भाविक जुने गोवे येथे पोहोचले.

गोव्यासह, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र या राज्यांतून भाविक शवप्रदर्शनासाठी येत आहेत. आंतरराज्य बसेस सध्या जुने गोवे परिसरात उभ्या केलेल्या दिसतात. त्यात पर्यटक देखील शवप्रदर्शन सोहळ्याचा अनुभव घेताना दिसून आले.

मोठा पोलिस फौजफाटा तैनात

नोव्हेनाला आलेले भाविक, तसेच रविवार असल्याने इतर लोक देखील फेरीत खरेदी करण्यासाठी आलेले दिसले. फेरी पूर्णतः उभारली गेली असून खरेदीसाठी येणाऱ्यांचा आकडा वाढणार आहे. पोलिस बंदोबस्त केला गेला असल्याने पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

जुने गोवे - पिलार रस्त्यावर मंडूर, पिलार, आगशी येथे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलिस तैनात केले आहेत. त्याशिवाय जुने गोवेला जोडणाऱ्या इतर रस्त्यांवर देखील पोलिस तैनात केलेले दिसतात.

Saint Francis Xavier Exposition
Goa Finance Scam: गोव्यात आजवरचा सर्वात मोठा आर्थिक घोटाळा; गुंतवणुकीच्या नावाखाली 50 जणांना 130 कोटींचा गंडा

शवदर्शनासाठी लांबच लांब रांगा

नोव्हेना सुरू झाल्याने सकाळच्या प्रार्थनेसाठी मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी झाली. पहाटे ४ वाजल्यानंतर भाविक येण्यास सुरवात झाली होती. काही भाविक पदयात्रा करून आले होते, त्यांनी नंतर भाविकांसाठी उभारलेल्या तंबूत जाऊन आराम केला.

त्याशिवाय राज्यभरातून बस, खासगी वाहनाने भाविक जुने गोव्यात पोहोचले. सकाळी ७ वाजता सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या शवाचे दर्शन घेण्यासाठी गांधी सर्कलपर्यंत रांग लागली होती. त्यानंतर भाविक येणे सुरू असल्याने ही रांग वाढत जात होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com