Manohar Airport: आनंदोत्सव! मनोहर विमानतळावर झाले पहिले व्यावसायिक लॅन्डिंग

हैद्राबाद-गोवा फ्लाइट क्रमांक 6 E 6145 ही पहिली व्यावसायिक फ्लाईट विमानतळावर उतरली आहे.
Manohar Airport
Manohar AirportDainik Gomantak
Published on
Updated on

उत्तर गोव्यातील बहुप्रतिक्षित मोपा (Mopa) येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ आजपासून (दि.05, जानेवारी) कार्यान्वित झाले आहे. ‘जीएमआर’ कंपनीकडून (GMR Company) चालवण्यात येणाऱ्या या विमानतळावर पहिल्याच दिवशी 11 विमाने उतरतील व उड्डाणे घेणार आहेत. दरम्यान, आज मोपा विमानतळावर प्रथम इंडिगो कंपनीचे (Indigo) विमान उतरले आहे. हैद्राबाद-गोवा फ्लाइट क्रमांक 6 E 6145 ही पहिली व्यावसायिक फ्लाईट विमानतळावर उतरली आहे. यावेळी जीएमआर कंपनीच्या वतीने पहिल्या विमानातील प्रवाशांच्या स्वागत करण्यात आले.

(First Commercial Fight landed on Manohar International Airport, Goa)

Manohar Airport
Manohar Airport: हैद्राबादवरून मोपासाठी विमान उड्डाण झाले; 'मनोहर'ही सजले, पाहा खास फोटो

मनोहर विमानतळावर पहिल्या व्यावसायिक लॅन्डिंगचा मान इंडिगो कंपनीच्या हैद्राबादवरून आलेली 6 E 6145 या फ्लाईटला मिळाला आहे. हैद्राबादवरून 7.40 वाजता निघालेली फ्लाईट मनोहर विमानतळावर 8.40 वाजता पोहोचली. एक तासांत या फ्लाईने हैद्राबाद-गोवा अंतर पूर्ण केले आहे. विमानतळावरी उतरलेल्या प्रवाशांचे जंगी स्वागत यावेळी करण्यात आले.

Shripad Naik And Rohan Khaunte
Shripad Naik And Rohan KhaunteDainik Gomantak
Manohar Airport
Manohar Airport: शुभारंभ! मोपा’वरून आज 11 विमानोड्डाणे

दरम्यान, मोपावरून होणाऱ्या पहिल्या उड्डाणासाठी देखील विमानतळावर प्रवाशांची वर्दळ दिसून आली. केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक आणि गोव्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी यावेळी पहिला बोर्डिंग पास दिला. तसेच, टॅक्सी चालकांनी आज आंदोलनाचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर विमानतळ परिसरात कलम 144 म्हणजेच जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. विमानतळावर देखील पोलिस तसेच, वाहतूक पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Manohar Airport
Manohar Airport North Goa Police

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Chipi to Navi Mumbai flight starts from August 15
Goa Athletics Championship
DR. Ram Manohar Lohia Journey:
 80th Anniversary DR Ram Manohar Lohia
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com