Manohar Airport: शुभारंभ! मोपा’वरून आज 11 विमानोड्डाणे

‘जीएमआर’ कंपनीकडून चालवण्यात येणाऱ्या या विमानतळावर पहिल्याच दिवशी 11 विमाने उतरतील व उड्डाणे घेतील.
Mopa Airport Project
Mopa Airport ProjectDainik Gomantak

Mopa Airport: उत्तर गोव्यातील बहुप्रतिक्षित मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ गुरुवारपासून कार्यान्वित होत आहे. ‘जीएमआर’ कंपनीकडून चालवण्यात येणाऱ्या या विमानतळावर पहिल्याच दिवशी 11 विमाने उतरतील व उड्डाणे घेतील.

तर दुसरीकडे टॅक्सी व्यावसायिक आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रीय महामार्गापासून विमानतळ परिसरापर्यंत जमावबंदीचे 144 कलम लागू करण्‍यात आले आहे. तसेच पेडणेतील स्‍थानिक टॅक्‍सी चालकांसाठी ‘ब्ल्यू कॅप ॲप’ सुरू करण्‍यात येत आहे.

मोपा विमानतळावरून प्रत्‍यक्ष विमानसेवा सुरू होत असल्‍याने मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी बुधवारी पर्यटनमंत्री रोहन खंवटे, वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो, उत्तर गोवा जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, वाहतूक अधीक्षक यांची बैठक घेऊन विविध सूचना केल्या आहेत. तसेच टॅक्सी चालकांच्या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर विमानतळ परिसरात जमावबंदीचे आदेश

देण्यात आले असून, कलम 144 लागू करण्यात आले आहे. कोणीही ‘मोपा’वर उतरणारे प्रवासी आणि पर्यटकांना कोणत्याही प्रकारचा अडथळा आणू नये; अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा सज्जड दम मुख्यमंत्री सावंत यांनी दिला आहे. पोलिसांनाही सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

  • विमानतळावरून प्रवासी वाहतुकीसाठी सरकारने ‘गोवा टॅक्सी ॲप’ सुरू केले आहे. मात्र, अद्यापही ते कार्यान्वित झालेले नाही.

  • तथापि, आतापर्यंत 1.100 टॅक्‍सीचालकांनी त्‍यात सहभाग नोंदवला आहे. पैकी पडताळणीअंती 100 टॅक्‍सी कार्यान्‍वित होतील.

  • पेडणेतील टॅक्सी व्यावसायिकांनी काळ्या-पिवळ्या टॅक्सीसाठी स्वतंत्र काउंटर सुरू करावे, यासाठी आंदोलन सुरू केले आहे. सरकारने ही मागणीही वेगळ्या पद्धतीने मान्य केली आहे.

  • पेडणेतील टॅक्सींसाठी ‘ब्ल्यू कॅप ॲप’ सुरू करण्यात आले असून, आज ते अधिसूचित होईल. पेडणे तालुक्यातील टॅक्सीचालकांनी त्यावर नाव नोंदणी करावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

आज मोपा विमानतळावर प्रथम इंडिगो कंपनीचे विमान उतरेल. याचा फ्लाइट क्रमांक 6ई 6145 हैद्राबाद-गोवा असा असेल, अशी माहिती जीएमआर कंपनीच्या वतीने देण्यात आली आहे.

कंपनीच्या वतीने पहिल्या विमानातील प्रवाशांच्या स्वागतासाठी मोठी तयारी केली आहे. दुसरीकडे प्रशासनानेही विमानतळ सुरू होण्याची जय्यत तयारी केली असून तिथे उतरणाऱ्या प्रवाशांकरिता कदंबच्या विशेष लक्झरी बसेससह टॅक्सी सेवा ही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Mopa Airport Project
Petrol-Diesel Price Today : पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ नाही

मोपा येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांचे नाव देण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल सर्वानुमते घेण्यात आला.

डिसेंबरमध्ये पंतप्रधानांच्या हस्ते उद्‍घाटन करण्यात आलेल्या गोव्यातील या दुसऱ्या विमानतळाचे नाव मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ असे दिले असले तरी तसे अधिकृतरीत्या आज निश्चित झाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com