गोव्यातील पहिली व्यावसायिक पायलट: रिचा गोवेकर

अवकाशी झेप घेण्याची स्वप्नपूर्ती
Pilot Richa Govekar News | Goa Latest News updates in Marathi
Pilot Richa Govekar News | Goa Latest News updates in Marathi Dainik Gomanatk
Published on
Updated on

तुकाराम सावंत

डिचोली: लहान असतानाच आकाशातील तारे बघितले की कुतूहल वाटायचे. आपण खालून ताऱ्यांचे दृष्य पाहतो तसे आकाशातून ते कसे बरे दिसत असणार, असा प्रश्न चौथीतच तिला पडला. आपणही कधी तरी अवकाश भरारी करून पृथ्वीतलावरील निरीक्षण करावे, असेही तिला वाटायचे. हे स्वप्न ती उरात बाळगून होती आणि तिने ते साकारलेही. रिचा गोवेकर ही गोमंतभूमीतील पहिली वहिली युवा व्यावसायिक पायलट बनली. संपूर्ण गोव्यातून रिचावर कौतुकाचा वर्षाव झाला. मात्र तिने मिळवलेले हे यश इतके सहज नव्हते. रिचाची ही संघर्षयात्रा इतरही मुलींना प्रेरणा देणारी आहे. (Pilot Richa Govekar News Updates)

Pilot Richa Govekar News | Goa Latest News updates in Marathi
'गोव्यात भाजपचेच सरकार येणार'

आठवीत पोचल्यानंतर वैमानिक क्षेत्रात गेल्यास आपणास अवकाश यात्रा करता येते, हे रिचाला कळले. तेव्हाच तिने पायलट होण्याचा निश्चय केला. बारावीत असताना मैत्रिणीसोबत चर्चा करताना तिने पायलट होणार असे सांगितल्यावर तिच्या मैत्रिणींना मस्करी वाटली. पायलट म्हणजे काय, हे माहीत आहे का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.(Goa Latest News updates in Marathi)

Pilot Richa Govekar News | Goa Latest News updates in Marathi
बाणावली येथील जेडन परेरा सोडल्यास सर्व विद्यार्थी परतले

वडिलांवर शस्त्रक्रिया, परीक्षाही हुकली

पायलट होण्याची स्वप्नपूर्ती झाली असली, तरी सुरवातीच्या काळात रिचाला कठीण प्रसंगातून जावे लागले. उत्तरप्रदेशमधील रायबरेली कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याची तयारी चालू होती. प्रवेश परीक्षा अर्जही भरला होता. मात्र त्याचवेळी वडिलांवर शस्त्रक्रिया करावी लागली. त्यामुळे रिचाला परीक्षा देता आली नाही. मात्र तिने जिद्द सोडली नाही. नंतर बारामती-पुणे येथील कार्वर ऍविएशन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. प्रशिक्षण सुरु झाले आणि पुन्हा तसाच प्रसंग वाट्याला आला. मात्र त्यावेळी आईवडील, नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींनी मानसिक धीर दिला.

युवा पिढीला संदेश

‘यद भव, तद भवती’ अशी संस्कृतमध्ये एक म्हण आहे. म्हणजेच ध्येयप्राप्ती करायची असेल, तर अगोदर स्वतःवर विश्वास असणे आवश्यक आहे. कोणी काहीही म्हटले, तरी त्याकडे दुर्लक्ष करून मार्गक्रमण केले, तर ध्येयप्राप्तीपर्यंत पोचणे अवघड नाही, असा संदेशही रिचा गोवेकर हिने युवा पिढीला दिला आहे. म्हणतात ना, इच्छा तिथे मार्ग असतो. त्यामुळेच आपण आपले ध्येय तडीस नेऊ शकले अशी प्रतिक्रिया रिचा हिने ‘गोमन्तक’कडे व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com