मडगाव: युक्रेनात अडकलेल्या 21 पैकी 20 गोमंतकीय विद्यार्थ्यांना ऑपरेशन गंगा खाली गोव्यात आणण्यास भारत सरकारला यश आले असले तरी बाणावली येथील जेडन परेरा हा 19 वर्षीय विद्यार्थी अजून तिथेच अडकून पडला आहे. जेडन आणि त्याचे अन्य भारतीय मित्र रशियाजवळ असलेल्या समी या शहरात अडकले असून, युक्रेनमधून त्यांना रशियात जाण्यास युक्रेनी सैन्य सोडत नाहीत, अशी माहिती मिळाली आहे. समी हे शहर रशियन सीमेपासून अवघ्या 60 किलोमीटर अंतरावर आहे.
एनआरआय संचालनालय कार्यकायातून मिळालेल्या माहितीनुसार, आज (सोमवारी) कुडतरी येथील प्रताप ऋत्विक हा गोव्यात पोहोचला तर विद्यानगर मडगाव येथील सानिया मारियामत ही विद्यार्थिनी केरळातील कोची या शहरात उतरली. कुडतरी येथील जोमार्क डायस हा युवक काल पोलंडहून भारतात आला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.