Mandrem: 40 बाउन्सर घेऊन मांद्रेत दहशत, 'त्या' कंपनीच्या सचिवाविरोधात गुन्हा दाखल

Morjim Land iDspute: दहशतीचे वातावरण निर्माण करणे आणि मुडकारांच्या घराशेजारी लोखंडी कंपाउंड घालून वाट अडवण्याचा प्रयत्न करणे याप्रकरणी मांदे पोलिसांनी ‘मेसर्स रेंडर हुट हॉस्पिलीटी लिमिटेड’ च्या सचिवावर गुन्हा नोंद करण्यात आलाय.
Mandrem
MandremDainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी: जुनसवाडा-मांद्रे किनारी भागातील मुंडकारांच्या जमिनीमध्ये ४० बाउन्सर घालून त्या ठिकाणी दहशतीचे वातावरण निर्माण करणे आणि मुडकारांच्या घराशेजारी लोखंडी कंपाउंड घालून वाट अडवण्याचा प्रयत्न करणे याप्रकरणी मांदे पोलिसांनी ‘मेसर्स रेंडर हुट हॉस्पिलीटी लिमिटेड’ च्या सचिवावर गुन्हा नोंद केल्याची माहिती पोलिस निरीक्षक गितेंद्र नाईक यांनी दिली.

हा प्रकार निंदनीय असून जोपर्यंत मुंडकारांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत आपण गप्प बसणार नाही. जे काही कायद्याने आहे ते कायद्याने जमीन मालकाने करावे, असे मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी यावेळी सांगितले.

यावेळी मुंडकार आग्नेलो फर्नांडिस, रोझारियो फर्नांडिस, ॲन्ड्री फर्नांडिस, जॉनी फर्नांडिस, अंतोन फर्नांडिस, पंच रॉबर्ट फर्नांडिस, माजी सरपंच मिंगेल फर्नांडिस उपस्थित होते.

Mandrem
Super Cup 2025: ..शेवटच्या मिनिटात फिरवली मॅच! FC Goa चे पिछाडीवरून अफलातून पुनरागमन; पंजाबवर 2-1 अशी मात

शुक्रवारी (२५ एप्रिल) सकाळी १० च्या सुमारास कंपनीने कुंपण घालण्याचे काम सुरू केले. त्यावेळी ४० पेक्षा जास्त बाऊनसर या ठिकाणी उपस्थित होते. या कामाला अँथनी फर्नांडिस यांनी आक्षेप घेतला. व याबाबत स्थानिक पंच रॉबर्ट फर्नांडिस यांना कळवले. त्यानंतर सरपंच, इतर पंच व सचिव अमित प्रभू घटनास्थळी दाखल झाले. याबाबत अँथनी फर्नांडिस यांनी पोलिसांत तक्रार केल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

यावेळी सरपंच राजेश मांद्रेकर यांनी सांगितले की, महिन्याभरापूर्वी का कंपनीने परवानगी मागितली होती, परंतु या जागेत मुंडकार राहत असल्याने व या जागेचा वाद न्यायलयात असल्याने पंचायतीने परवानगी नाकारली होती. दरम्यान, संचालनालयाने या कामाला परवानगी दिल्याने कंपनीने काम सुरू केले. पंचायत ग्रामस्थांसोबत आहे, त्यामुळे काम बंद करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.

Mandrem
Goa Police: गोवा पोलिसांचे Combing Operation! 666 संशयित, 147 जणांवर गुन्हे; 2189 जणांची कागदपत्रे तपासली

जूनसवाड्यावर जागेत बाऊन्सर मुंडकार व स्थानिक लोकांना मारहाण करण्यासाठी आले असावेत, त्यामुळे त्यांना ताबडतोब अटक करावी, अशी मागणी युवक अँथनी फर्नांडिस यांनी केली होती. यावेळी पंच मिगेल फर्नांडिस, किरण सावंत, महेश कोनाडकर, संपदा आजगावकर व चेतना पेडणेकर उपस्थित होते.

दरम्यान, खासगी जागेत प्रवेश केल्याबद्दल पोलिसांकडे सचित्र तक्रार दिली होती. पोलिसांनी त्यांना त्वरित अटक करावी, अशी पंच रॉबर्ट फर्नांडिस व प्रशांत नाईक यांनी केली होती. पोलिस निरीक्षक नाईक यांनी, या विरोधात २४ तासांत कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी दिली. अखेर आता ‘मेसर्स रेंडर हुट हॉस्पिलीटी लिमिटेड’ च्या सचिवावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com