Goa Traffic Rule: वाहतूकीचे नियम मोडाल तर इतका होईल दंड; वाहतूक विभागाने जाहीर केली यादी

अधिसूचना जारी
 Traffic Rule
Traffic RuleDainik gomantak
Published on
Updated on

गोव्याची राजधानी पणजी येथे इंटेलिजेंट सिटी मॅनेजमेंट सिस्टिम कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. या सिस्टिमद्वारे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर नरज राहणार आहे. वाहतुकीचे नियम मोडल्यास मोबाईलवर चलन मिळणार आहे.

दरम्यान वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर वाहतूक कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. नियम मोडणाऱ्यांवर किती दंडाची रक्कम आकारली जाईल याची यादी वाहतूक खात्याने जाहीर केली आहे.

 Traffic Rule
Uday Madkaikar : सल्लागाराला कामांसाठीचा दिला जाणारा निधी त्वरित रोखा; मडकईकरांची मागणी
  1. वाहन चालविताना मोबाईलचा वापर केल्यास पहिल्या वेळी 1 हजार रुपये दंड तर नंतर 10 हजार रुपये दंड आकारला जाईल.

  2. ट्राफिक सिग्नल तोडल्यास पहिल्या वेळी 500 रुपये दंड तर नंतर 1 हजार रुपये दंड आकारला जाईल.

  3. सिट बेल्ट न लावल्यास पहिल्या वेळी 1 हजार रुपये दंड तर नंतर 1 हजार रुपये दंड आकारला जाईल.

  4. हेल्मेट परिधान न केल्यास पहिल्या वेळी 1 हजार रुपये दंड तर नंतर 1 हजार रुपये दंड आकारला जाईल.

  5. वेगमर्यादेचे नियम न पाळल्यास पहिल्या वेळी हलक्या वाहनांना 1 हजार रुपये दंड, इतर वाहनांना 2 हजार रुपये तर नंतर हलक्या वाहनांना 1 हजार रुपये दंड, इतर वाहनांना 2 हजार रुपये आकारला जाईल.

  6. आपत्कालीन वाहनांना मार्ग न दिल्यास पहिल्या वेळी 10 हजार रुपये तर नंतर 10 हजार रुपये दंड आकारला जाईल.

  7. अनधिकृत ठिकाणी वाहन थांबवणे किंवा पार्किंग केल्यास पहिल्या वेळी 500 रुपये तर नंतर 1 हजार रुपये दंड आकारला जाईल.

  8. टू व्हिलरवर दोनपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक केल्यास पहिल्या वेळी 1 हजार रुपये तर नंतर 1 हजार रुपये दंड आकारला जाईल.

  9. ओव्हरटेक केल्याने इतर वाहनचालकांची गैरसोय झाल्यास पहिल्या वेळी 500 रुपये तर नंतर 1 हजार रुपये दंड आकारला जाईल.

  10. माल वाहतूक करणाऱ्या वाहनाने प्रवासी वाहतूक केल्यास पहिल्या वेळी 500 रुपये तर नंतर 1 हजार रुपये दंड आकारला जाईल.

  11. फॅन्सी नंबर प्लेटचा वापर केल्यास पहिल्या वेळी 500 रुपये तर नंतर 1 हजार रुपये दंड आकारला जाईल.

 Traffic Rule
Goa Traffic Rule: भावांनो... एक जूनपासून वेगावर मर्यादा ठेवा!

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार खालील वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास दंडासह 3 महिन्यांसाठी वाहतूक परवाना रद्द होवू शकतो.

  • ट्राफिक सिग्नल तोडल्यास

  • वेगमर्यादेचे नियम न पाळल्यास

  • वाहन चालविताना मोबाईलचा वापर केल्यास

  • माल वाहतूक करणाऱ्या वाहनाने प्रवासी वाहतूक केल्यास

  • क्षमतेपेक्षा जास्त माल वाहतूक केल्यास

  • दारू किंवा अमली पदार्थांचे सेवन करुन वाहन चालविल्यास

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com