Uday Madkaikar : सल्लागाराला कामांसाठीचा दिला जाणारा निधी त्वरित रोखा; मडकईकरांची मागणी

स्मार्ट सिटीची कामे निकृष्ट
Uday Madkaikar
Uday MadkaikarDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

सध्या स्मार्ट सिटीचा वाद बराच रंगला आहे. पणजीचे आमदार तथा मंत्री बाबूश मोन्सेरात यांनीही या कामांवर प्रश्‍नचिन्ह निर्माण केले आहे. दर्जाहीन स्मार्ट सिटीच्या कामांविरोधात मोन्सेरात यांनी जाहीर वक्तव्य केल्यानंतर संबंधित सल्लागाराला कामांसाठीचा दिला जाणारा निधी त्वरित रोखावा, अशी मागणी नगरसेवक उदय मडकईकर यांनी केली आहे.

Uday Madkaikar
MLA Michael Lobo: प्रादेशिक आराखड्यात घोटाळा नाहीच; लोबोंचा दावा

‘पणजीतील स्मार्ट सिटीचे काम हलक्या दर्जाचे निकृष्ट असून या कामाची सर्वस्वी जबाबदारी सल्लागाराची आहे. यासाठी सरकारने आठ कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यामुळे तेच या कामाला जबाबदार राहतील’, असे मोन्सेरात म्हणाले होते.

त्यानंतर आज मडकईकर म्हणाले, की पणजीत आतापर्यंत झालेल्या सर्व स्मार्ट सिटी कामांचे विशेष ऑडिट करावे, असा ठराव घेण्याची मागणी आपण पणजी मनपाच्या बैठकीत करणार आहे. तसेच जर स्मार्ट सिटी सल्लागाराला पेमेंट देणे बाकी असल्यास ते त्वरित रोखावे ही आपली प्रमुख मागणी आहे.

दरम्यान, स्मार्ट सिटीचे काम निकृष्ट दर्जाचे करतानाच करदात्यांच्या पैशांची खुलेआम लूट होत आहे. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेस नेते एल्विस गोम्स यांनीही गुरुवारी केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Mhadei Water Dispute Thrilling Update
Goa CZMP 2019 Kushavati District
Santinez Footpath Damage Panaji
UN Correct The World Map
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com