Zuari Flyover: फ्लायओव्हरवर कमी वेगमर्यादा पाळणे अवघड!

वाहनचालकांसाठी डोकेदुखी : नवीन झुआरी उड्डाणपुलावर ताशी 20 ते 40 किमी वेगमर्यादा
Zuari Flyover
Zuari FlyoverDainik Gomantak
Published on
Updated on

धीरज हरमलकर

नवीनच उभारण्‍यात आलेल्‍या चौपदरी झुआरी उड्डाणपुलावर (फ्लायओव्हर) अतिशय कमी वेगमर्यादेचे लावलेले फलक हे प्रत्यक्षात कुचकामी ठरताहेत. ताशी 20 ते 40 किलोमीटर वेगमर्यादा पाळणे वाहनचालकांना अवघड होत आहे. ही वेगमर्यादा त्‍यांच्‍याकडून पाळली जात नाहीय.

Zuari Flyover
Vegetables Price In Goa: राज्यात झाली मोजक्याच भाज्यांच्या उत्पादनात वाढ

सरकारी कामे ही अजबच असतात. बहुतेकदा या कामांचा आणि प्रत्यक्षात त्या उभ्या केलेल्या वस्तूचा उपयोग लोकांना होतच नाही. सरकारी अधिकाऱ्यांकडे असलेल्‍या नियोजनदृष्‍टीचा अभाव हे त्‍याचे मुख्‍य कारण होय. काही महिन्यांपूर्वी नवीन झुआरी फ्लायओव्हर रहदारीसाठी खुला करण्यात आला. गेली अनेक वर्षे अरुंद रस्ते आणि त्यामुळे होत असलेल्‍या वाहतूक कोंडीपासून सुटका व्हावी यावर उपाययोजना म्‍हणून हा उड्डाणपूल बांधण्यात आलाय.

पण अजब गोष्ट म्हणजे, त्‍यावर 20, ३० व ४० किलोमीटर वेगमर्यादाचे फलक उभे करण्यात आले आहेत. विरोधाभास म्हणजे या फ्लायओव्हरवर धावणारे एकही वाहन ही वेगमर्यादा पाळू शकत नाही.

याबाबत काही लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या असता, अनेकजण इतक्या कमी वेगमर्यादेविषयी असहमत असल्याचे दिसून आले. वास्को येथील ‘गोवा फर्स्ट’ या संस्थेचे अध्यक्ष परशुराम सोनुर्लेकर यांनी सांगितले की, फ्लायओव्हरवर ताशी २० ते ३० वेगमर्यादा ठेवणे हे कठीण आहे. एवढा मोठा फ्लायओव्हर बांधण्यामागचा हेतूच हा की वाहतूक सुरळीत होऊन वेळेची बचत व्‍हावी. जर वाहनचालक ताशी २० आणि ३० किलोमीटर वेगाने गाड्या चालवू लागले तर काय अर्थ?

Zuari Flyover
Panjim Municipality: महानगरपालिकेने पाठविले सर्वेक्षणाविषयी सूचना पत्र

सांकवाळ येथील पीटर डिसोझा यांच्‍या मते, जगभरात रस्त्याच्या डाव्या व उजव्‍या बाजूला ताशी ६० किलोमीटर वेगमर्यादा पाळली जाते. तेच धोरण गोव्यात वापरले पाहिजे. लोकांनी वळणांवर लक्ष ठेवून कमी वेगात गाडी हाकावी, पण फ्लायओव्हरवर इतक्या कमी वेगात गाडी चालवणे ही कल्‍पनाच करवत नाही.

ताशी ५० किलोमीटर वेगमर्यादा हवी

बायणा येथील एग्नेस पिंटो या म्‍हणाल्‍या की, झुआरी फ्लायओव्हरवर असलेले कमी वेगमर्यादेचे फलक हे प्रत्यक्षात अंमलात आणणे कठीण आहे. ताशी ३० व ४० किलोमीटर अशा वेगमर्यादेत वाहने हाकणे अवघड आहे. ताशी ५० किलोमीटर या वेगाने गाडी चालवण्यास काहीच हरकत नसावी. वेगमर्यादा या प्रत्यक्षात वापरात आणता याव्यात अशाच हव्यात, फक्त फलक असून काय उपयोग?

तर, म्हापसा येथील श्रावणी कारापूरकर यांनी सांगितले की, ही वेगमर्यादा योग्य आहे. वाहनांचा कमी वेग असेल तर अपघात होणार नाहीत. चालकाचा आपल्या वाहनावर ताबा राहील. चालकांनी अतिवेगाने वाहने न चालवता ती शिस्‍तीत चालवावी.

फ्लायओव्हरवर ताशी २० ते ३० किलोमीटर वेगमर्यादा ठेवणे हे खूप कठीण काम आहे. एवढा मोठा फ्लायओव्हर बांधण्यामागचा हेतूच हा अाहे की वाहतूक सुरळीत होऊन वेळेची बचत व्‍हावी. जर वाहनचालक ताशी २० आणि ३० किलोमीटर वेगाने गाड्या चालवू लागले तर त्‍याला काय अर्थ?

- परशुराम सोनुर्लेकर, ‘गोवा फर्स्ट’चे अध्यक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com