Sanjivani Sugar Factory Protest: अखेर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन मागे! मुख्यमंत्र्यांनी सांगितले...

मुख्यमंत्र्यांनी पुढच्या वर्षी संजीवनी साखर कारखाना सुरू करण्याचे आश्वासन दिले
Sanjivani Sugar Factory Protest
Sanjivani Sugar Factory ProtestDainik Gomantak
Published on
Updated on

Sanjivani Sugar Factory Protest: मागील काही दिवसांपासून सुरू असलेले संजीवनी साखर कारखान्याच्या ऊस उत्पादकांचे आंदोलन आज शमले. काल (8 जानेवारी) आक्रमक शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आपला मोर्चा वळवला होता.

Sanjivani Sugar Factory Protest
Goa Daily News Wrap: खून प्रकरणातील ठळक घडामोडी, पाऊस, आंदोलन आणि दिवसभरातील महत्वाच्या बातम्यांचा आढावा

शेवटी मुख्यमंत्र्यांनी पुढच्या वर्षी संजीवनी साखर कारखाना सुरू करण्याचे आश्वासन दिले. यानंतर शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतल्याचे जाहीर केले आहे. काल संध्‍याकाळी मोर्चा अडविल्‍यानंतर मिळालेल्‍या आश्‍‍वासनाप्रमाणे सरकारच्‍या वतीने कुणीही भेट देण्‍यास न आल्‍याने आंदोलकांनी रात्री आझाद मैदानावरच राहणे पसंद केले. चार गाड्या भरून दाखल झालेल्‍या आंदोलकांइतकेच पोलिसही आझाद मैदान परिसरात तैनात हाते.

तत्‍पूर्वी सायंकाळी आपल्‍या मागण्‍या घेऊन मुख्‍यमंत्र्यांच्‍या बंगल्‍याकडे जाण्‍याच्‍या पवित्र्यात असलेल्‍या शेतकऱ्यांचा मोर्चा पोलिसांनी वाटेत अडवला व काही जणांना ताब्‍यात घेतले. शेवटी मुख्यमंत्र्यांनी कारखाना पुढील वर्षी सुरू करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आज शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com