Goa Comunidade: माजी ॲटर्नी परेरांवर एफआयआर नोंदवा

Goa Comunidade: थिवी कोमुनिदाद घोटाळा : डिचोली न्यायालयाचा कोलवाळ पोलिसांना निर्देश
Goa Comunidade
Goa ComunidadeDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Comunidade:

थिवी कोमुनिदादमधील घोटाळाप्रकरणी कोमुनिदादच्या माजी ॲटर्नीविरोधात एफआयआर (गुन्हा) दाखल करण्यात यावा व त्याची माहिती आदेश दिल्यापासून तीस दिवसांच्या आत न्यायालयाला द्यावी, असा आदेश डिचोली प्रथमश्रेणी न्यायालयाचे न्यायाधीश अनुराधा आंद्राद यांनी कोलवाळ पोलिसांना दिला आहे.

माडेल-थिवी येथील डग्लस सिक्वेरा यांंच्यासह इतरांनी थिवी कोमुनिदादमध्ये झालेल्या १५.५० लाखांच्या घोटाळा प्रकरणी ५ डिसेंबर २०२२ रोजी कोमुनिदादचे माजी ॲटर्नी साविओ परेरा यांच्याविरुद्ध तक्रार दिली होती.

मात्र, कोलवाळ पोलिसांनी या तक्रारीचा तपास केला नाही व गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे पोलिसांत दुसरी तक्रार ८ मार्च २०२३ रोजी देण्यात आली होती. साविओ हे २०१९ मध्ये कोमुनिदादचे ॲटर्नी होते व त्यांना कोमुनिदादच्या सर्व दस्तावेजाची हाताळणी करण्यास परवानगी होती.

Goa Comunidade
Turtle conservation: मोरजीत ‘कासव संवर्धन’ यशस्वी

थिवी येथील सर्व्हे क्रमांक ३४६/२ मध्ये केथ लुईस व गेर्ती लुईस व त्यांच्या इतर कुटुंबाची जागा आहे व त्यांना त्यातून वाट नाही. परेरा यांनी १५.५० लाख रुपये लुईसचे ॲटर्नी झाकारिस व्हिक्टर डिसोझा यांच्याकडून घेऊन सर्व्हे क्रमांक ३४६/१ मधून वाट दिली होती व त्यासाठी कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न करता ना हरकत दाखला (एनओसी) दिला होता.

त्यांनी ही रक्कम कोमुनिदादच्या खात्यात जमा केली नाही. यासंदर्भातची तक्रार उत्तर गोवा पोलिस अधीक्षकांकडे देऊनही त्याची नोंद घेतली नव्हती. सिक्वेरा यांनी न्यायालयात सादर केलेल्या तक्रार अर्जानुसार त्यातून दखलपात्र गुन्हा उघड होत आहे.

Goa Comunidade
Talegaon Illegal Construction: आल्मेदाच्या मालमत्तेतून थकबाकीची वसुली करू

कायद्यानुसार चौकशी करावी!

अर्जदार सिक्वेरा यांनी वारंवार तक्रार देऊन व विनंती करूनही त्याची दखल घेण्यात आली नाही. एफआयआर का नोंद केला नाही, हे त्या संंबंधित अधिकाऱ्याला माहीत असावे, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयासमोर सादर केलेल्या दस्तावेजातून दखलपात्र गुन्हा सिद्ध होत आहे व त्याचा तपास करण्यात आलेला नाही. त्यामुळे संबंधित क्षेत्रातील पोलिस अधिकाऱ्याने एफआयआर दाखल करून कायद्यानुसार चौकशी करावी, असे निर्देश न्यायाधीश आंद्राद यांनी दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com