Anjuna Tourist Attacked: दिल्लीच्या 'त्या' पर्यटकांवर गुन्हा नोंदवा; हणजूणवासीय एकवटले!

रिसॉर्टच्या स्टाफने दिलेल्या तक्रारीची पोलिसांनी दखल न घेतल्याचा आरोप
Anjuna Tourist Attacked Case | Anjuna Residents
Anjuna Tourist Attacked Case | Anjuna Residents Dainik Gomantak

Anjuna Tourist Attacked Case: हणजूण येथे दिल्लीच्या एका पर्यटक कुटूंबावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचे पडसाद आता सर्वत्र उमटू लागलेत. याच पार्श्वभूमीवर, गुरुवारी हणजूण (Anjuna) मधील स्थानिकांनी एकत्र येत या पत्रकार परिषद घेतली. त्यात घटनेचा निषेध नोंदवत, संबंधित पर्यटकांवर कारवाई करण्याची मागणी केली.

Anjuna Tourist Attacked Case | Anjuna Residents
MPA Goa: आमदार आमोणकरांनी दिला इशारा; 'एमपीए'च्या 9 नंबर गेटमधून बॉक्साईट वाहतूक झाली बंद

याप्रकरणी आधी संबंधित पर्यटकांनी रिसॉर्टच्या स्टाफला शिवीगाळ करीत त्याला मारहाण केली. त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून फक्त एकच (स्वतःची) बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. हे प्रकरण दुर्दैवी असले तरी यात रिसॉर्टच्या स्टाफची चूक नाही.

पर्यटकांनी जारी केलेल्या त्या व्हिडिओच्या माध्यमातून चूकीचा संदेश सर्वत्र गेला. ज्यातून गोव्याच्या प्रतिमेची नाहक बदनामी झाली आहे, असे म्हणत गुरुवारी हणजूण रहिवाशांनी गोवा पोलिसांनी त्या दिल्लीच्या पर्यटकांवर देखील कारवाई करण्याची मागणी केली.

घटनेच्या दिवशी रिसॉर्टच्या स्टाफने पर्यटकांविरोधात पोलिसात तक्रार दिली होती. मात्र, पोलिसांनी अद्याप याची दखल न घेता कोणताही गुन्हा नोंदविला नाही, असेही स्थानिकांनी म्हटले आहे.

Anjuna Tourist Attacked Case | Anjuna Residents
CM Pramod Sawant: गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचा दिल्लीत केंद्रीय आयुष मंत्र्यांच्या हस्ते गौरव

आम्ही पर्यटकांचा आदर करतो, पण पर्यटकांनी दारु पिवून दंगामस्ती करू नये. आतापर्यंत याप्रकरणात एकतर्फी तपास झाला आहे.

पोलिसांनी सर्व बाजू तपासून पर्यटकांवरही कारवाई करावी. गोमंतकीय लोक हे संयमी व शांत स्वभावाचे असून राज्यातील शांतता भंग झालेली आम्हाला नको. या प्रकरणी गरज वाटली तर पोलिस स्थानकावर मोर्चा काढू, असा सज्जड इशारा स्थानिकांनी यावेळी दिला.

येत्या सोमवारपर्यंत (ता. 20) स्टाफने दिलेल्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी जर कारवाई न केल्यास आम्ही पोलीस महासंचालकांना भेटणार व त्यांना स्थानिकांची बाजू मांडू, असेही या स्थानिक हणजूणवासीयांनी गुरुवारी (ता.16) स्पष्ट केले.

यावेळी हणजूण-कायसूवचे सरपंच लक्ष्मीकांत चिमुलकर, स्थानिक गजानन तिळवे, योगेश गोवेकर आदी उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com