
Goa FDA Raid: गोव्यात गेल्या काही दिवसांपासून अन्न आणि औषध प्रशानसनाकडून धडक मोहीम राबवण्यात येत आहे. याचदम्यान प्रशासनाने एक मोठी कारवाई केली. मंगळवारी (18 फेब्रुवारी) उत्तर गोव्यातील समुद्रकिनारी असलेल्या काजूच्या तीन दुकानांविरोधात ही कारवाई करण्यात आली.
बालाजी काजू, पी. पटेल काजू आणि गोवा काजू हाऊस या तीन दुकानांची तपासणी अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी केली. एमएस गोवा काजू हाऊसमध्ये निकृष्ट काजूची विक्री सुरु होती. कमी दर्जाच्या काजूच्या पॅकेटवर चांगले काजू असलेले स्टिकर लावून विक्री सुरु असल्याचे अधिकाऱ्यांना आढळले. या 3 विक्रेत्यांविरोधात कायदेशीर खटला दाखल करण्यात आला आहे. याशिवाय, वजनाच्या स्केलमध्ये छेडछाड केल्याचेही आढळून आले. गोवा अन्न आणि औषध प्रशासनाचे संचालक रिचर्ड नोरोन्हा यांच्या मार्गदर्शनाखाली राजाराम पाटील, अन्न सुरक्षा अधिकारी अमित मांद्रेकर, साफिया खान आणि लेनिन देसा यांचा समावेश असलेल्या पथकाने ही कारवाई केली.
काही दिवसांपूर्वीच, म्हापसा (Mapusa) बसस्थानकावरुन मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. प्रशासनाने म्हापसा बस स्थानकावरुन तब्बल दीड लाखांचे 500 किलो पनीर जप्त केले होते. मुंबईतून गोव्यात येणारे फ्रोजन फूड, मावा, मसाले यासारखे खाद्यपदार्थ या छापेमारीत जप्त केले होते. रिचर्ड नोरोन्हा यांच्या नेतृत्वाखालील FDA अधिकाऱ्यांनी खाजगी वाहनांची अचानक तपासणी करुन दीड लाखांचे पनीर जप्त केले होते. महाराष्ट्र (Maharashtra) आणि कर्नाटक येथून येणाऱ्या खाजगी वाहनावर ही कारवाई करण्यात आली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.