Fatorda News : मडगावात अजूनही मान्‍सूनपूर्व कामे अपूर्णच

नाले व गटारे वरचेवर साफ केली जातात. त्यामुळे अनेक ठिकाणी नाले व गटारे तुंबण्याचे प्रकार घडत आहेत.
 Fatorda Road
Fatorda RoadGomantak Digital Team
Published on
Updated on

Fatorda News : चार दिवसांपूर्वी पडलेल्‍या अवकाळी पावसामुळे मडगाव नगरपलिकेला पाण्‍याने वेढा घातला होता. तीन ते चार तास हे पाणी तसेच राहिले होते. अशाने पालिकेतर्फे अन्य खात्यांच्या सहकार्याने मान्सूनपूर्व कामांना प्राध्यान्य देण्यात येत असले तरी अनेक ठिकाणचे नाले व गटारे अजूनपर्यंत साफ करण्यात आलेले नाहीत, त्यामुळे मडगावातील अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

याबाबत बोलताना मडगाव पालिकेचे प्रभाग क्रमांक 1 चे नगरसेवक फ्रान्सिस जॉन्‍सन म्‍हणाले की, नाले सफाईचे काम जलस्रोत खात्‍यातर्फे करण्यात येत आहे. या ठिकाणी नेमलेल्या कंत्राटदाराने 40 ते 50 टक्के काम पूर्ण केले आहे. उर्वरित काम बाकी आहे. हे काम वेळेत पूर्ण झाले नाही तर पुराची शक्यता आहे.

 Fatorda Road
Fatorda News: फातोर्ड्यातील पार्किंग कामाबाबत पालिका अनभिज्ञ

माजी नगरसेवक व शॅडो कौन्सिलचे समन्वयक सावियो कुतिन्हो म्हणाले की, नगरपालिका, जलस्रोत खाते व सार्वजनिक बांधकाम खाते यांचा सहयोगाने नाले व गटारांची सफाई करण्यात येत असते. यासाठी 40 ते 50 लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात येतो.

 Fatorda Road
Fatorda Water Supply : फातोर्डात पाण्याची पाईपलाईन बदलण्याच्या कामाला सुरवात ; विजय सरदेसाई

मात्र हे नाले व गटारे वरचेवर साफ केली जातात. त्यामुळे अनेक ठिकाणी नाले व गटारे तुंबण्याचे प्रकार घडत आहेत. तर, प्रभाग 10 चे नगरसेवक व्हिटोरिनो त्रावसो यांनी सांगितले की, येथील तीन मोठे नाले व सर्व गटारे साफ करण्यात आलेली आहेत. काही ठिकाणचे नाले साफ करण्याचे काम बाकी राहिलेले आहे, ते पावसाळ्यापूर्वी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. कारण कामे अपूर्ण राहिली तरी पावसाळ्‍यात मोठी समस्‍या निर्माण होऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com