Fatorda Municipality फातोर्डा येथील प्रस्तावित पार्किंग प्लाझाचे काम रोखण्यात कसलेही राजकारण नाही. मात्र गोवा राज्य नगरविकास मंडळाच्या (जी-सुडा) कंत्राटदाराने या कामाबद्दलची सविस्तर माहिती नगरपालिकेला दिलेली नाही.
त्यामुळेच या कामाचे नियोजन, आराखडा, जागेचे एकूण क्षेत्रफळ, काम पूर्ण करण्यास लागणारा अवधी, फेस्त भरविण्यासाठी पर्यायी जागेचा शोध हे सर्व जाणून घेण्याकरिताच हे काम तात्पुरते रोखण्यात आले आहे, असे स्पष्टीकरण नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिले.
पालिकेच्या तांत्रिक विभागातील कर्मचाऱ्यांनाही या कामाबद्दलची सविस्तर माहिती नाहीय. माडेल फातोर्डा येथील या कामासाठी काही दिवसांपूर्वी नियुक्त कंत्राटदाराने सभोवताली कुंपण घालण्याचे काम सुरू केले होते.
ते पालिकेने बंद ठेवण्यास सांगितले. त्यामुळे स्थानिक आमदार विजय सरदेसाई यांनी मडगावचे आमदार दिगंबर क कामत यांच्यासह नगराध्यक्ष व नगरपालिकेवर टीका करून नाराजी व्यक्त केली होती.
एका महिन्यापूर्वी पार्किंग ईप्लाझा प्रकल्पाची पायाभरणी करण्याचा कार्यक्रम आखला होता. त्यास नगरविकासमंत्री विश्वजीत राणे उपस्थित राहणार होते.
पण काही कारणाने ते उपस्थित राहू शकले नाहीत व कामाचा शुभारंभ फातोर्डा व मडगावातील नागरिकांच्या हस्ते उरकण्यात आला होता.
जी- सुडा'कडे आवश्यक परवाना नाही
जी-सुडाला यापूर्वी दिलेल्या परवान्याची मुदत 2019 साली संपली आहे. त्यांच्याकडे नगरनियोजन खाते तसेच नगरपालिकेचा वैध परवाना नसल्याचे व पालिकेने ही जागा पार्किंग प्लाझाच्या कामासाठी जी- सुडाकडे सुपुर्द केली नसल्याचे नगराध्यक्ष शिरोडकर यांनी सांगितले.
नवीन परवाना देताना किंवा निविदा तयार करताना फेस्तासाठीच्या पर्यायी जागेचा शोध करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.