Goa Accident News : करमल घाटात कार दरीत कोसळून युवक जागीच ठार; पर्वरीत कार दुभाजकाला धडकली

करमल घाट अपघातात तिघे गंभीर जखमी, एलपीजी गॅसवाहू ट्रकची समोरून धडक
Karmal Ghat Accident
Karmal Ghat AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

Karmal Ghat : काणकोण येथील करमल घाटातील एका तीव्र वळणावर कार व एलपीजी गॅसवाहू ट्रक यांच्यात समोरासमोर टक्कर होऊन झालेल्या अपघातात कार दरीत कोसळल्याने कारमधील एका युवकाचा जागीच मृत्यू होण्याची दुर्दैवी घटना घडली.

करमल घाटात आज संध्याकाळी 3.30 च्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात दोघेजण गंभीर, एक किरकोळ जखमी झाला असून त्यांना मडगाव जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती काणकोणचे पोलिस निरीक्षक चंद्रकांत गावस यांनी दिली. या घटनेचा अधिक तपास त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Karmal Ghat Accident
Rumdamol panchayat : चाकूहल्‍ला प्रकरण : तणाव निवळला, धग कायम

उपलब्ध माहितीनुसार, अंधेरी-मुंबईहून एकूण पाच जणांचा गट गोवा फिरायला आला होता. पाळोळे समुद्रकिनाऱ्यावर आज सकाळी फिरून दुपारी ते मडगावकडे निघाले असता करमल घाटात एका तीव्र वळणावर समोरून येणाऱ्या एलपीजी गॅसवाहू ट्रकची त्यांच्या कारला समोरून धडक बसली व कार दरीत कोसळली. या अपघातात वरुण गांधी याचे घटनास्थळी निधन झाले, तर अन्य जखमी झाले.

या घटनेची माहिती मिळताच काणकोण पोलिस व अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोचले. सर्व जखमींना काणकोण सामाजिक इस्पितळात दाखल केले व नंतर त्यांना मडगाव येथील जिल्हा इस्पितळात हलविण्यात आले. तसेच अपघातात निधन पावलेल्या वरुण गांधी याचा मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा इस्पितळात पाठवून देण्यात आला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक गावस यांनी दिली.

करमल घाटात धोकादायक वळणे

करमल घाटात अनेक ठिकाणी धोकादायक तीव्र वळणे आहेत. त्यामुळे दररोज लहान - मोठे अपघात होत आहेत. वेळोवेळी या विरोधात आवाज उठविला जात आहे. या रस्त्यावरील वळणे कापण्यासाठी सभापती रमेश तवडकर यांनी प्रयत्न चालवले आहेत.

Karmal Ghat Accident
Ponda Traffic :‘राव रे, वच रे’मुळे वाहतुकीवर ताण

अंधेरीहून आला होता ५ जणांचा गट

अंधेरी-मुंबईहून जिवाचा गोवा करण्यासाठी आलेल्या ५ जणांच्या गटाला या अपघाताला सामोरे जावे लागले आहे. सिया चोर्डिया, सेहावी लोधा या दोन युवती व वरुण गांधी, मेध पठावा, अमेय जंत्रे हे

३ युवक असे एकूण पाच जण १८ रोजी पाळोळे येथे पोचले होते. तेथील समुद्रकिनाऱ्याचा आनंद लुटल्यानंतर १९ रोजी दुपारी ते मडगावच्या दिशेने निघाले असता करमल घाटात हा अपघात झाला.

पर्वरीत अपघात; वाहतूक ठप्प

अटल सेतूच्याखाली पर्वरीहून पणजीला जाणाऱ्या एकतर्फी मार्गावर एक कार दुपारी चालकाचा ताबा सुटल्याने रस्ता दुभाजकाला धडकली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक सुमारे ५० मिनिटे ठप्प झाली. पणजीकडे जाणाऱ्या जीए ११ ए ५८११ कारचा चालक आश्विक पेडणेकर (रा. पर्वरी) यांचा कारवरील ताबा सुटला आणि कार मधेच बंद पडली. त्यामुळे या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com