Hajj Package Fraud: फेसबुकवरील 'स्वस्त हज पॅकेज' पडले महाग; वास्कोत 4.42 लाखांची फसवणूक

cheap Hajj package scam: सोशल मीडियावर हज यात्रा पॅकेजच्या बनावट जाहिरातीद्वारे एका स्थानिक नागरिकाची लाखोंची फसवणूक केल्याप्रकरणी वास्को पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला
4.42 lakh fraud Goa
4.42 lakh fraud GoaDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: सोशल मीडियावर हज यात्रा पॅकेजच्या बनावट जाहिरातीद्वारे एका स्थानिक नागरिकाची लाखोंची फसवणूक केल्याप्रकरणी वास्को पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नितीश आणि एका अनोळखी व्यक्तीविरोधात वास्कोतील बायणा येथील तक्रारदाराची फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

काय आहे फसवणुकीचे प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फेसबुकवर एक ऑनलाइन जाहिरात पोस्ट केली होती. या जाहिरातीत हज यात्रेसाठी सौदी अरेबियाला जाण्यासाठी स्वस्त आणि आकर्षक पॅकेजेसची ऑफर दिली होती. तक्रारदाराला त्यांच्या तीन मित्रांना किंवा नातेवाईकांना हज यात्रेसाठी पाठवायचे होते. त्यामुळे त्यांनी जाहिरातीत दिलेल्या नंबरवर संपर्क साधला.

आरोपींनी तक्रारदाराला हे ट्रॅव्हल पॅकेज खरेदी करण्यासाठी प्रवृत्त केले. इतकेच नाही, तर जर त्याने आणखी ग्राहक आणले, तर प्रत्येक व्यक्तीमागे ५,००० रुपयांची सवलत देण्याचे आमिष दाखवले.

4.42 lakh fraud Goa
Online Scam: व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो डाऊनलोड करणं पडलं महागात, 28 वर्षीय तरुणाला 2 लाखांचा चुना; काय आहे नेमके प्रकरण?

आरोपींच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तक्रारदाराने व्हिसा आणि इतर संबंधित खर्चासाठी एकूण ४,४२,३०० रुपये रोख रक्कम दिली.

सेवा नाही, पैसेही परत नाही!

पैसे मिळाल्यानंतर आरोपींनी तक्रारदाराला आश्वासन दिलेल्या सेवा पुरवल्या नाहीत. तसेच, दिलेली रोख रक्कम परत करण्यासही त्यांनी नकार दिला. अशा प्रकारे आरोपींनी तक्रारदाराची मोठ्या रकमेची फसवणूक केली.

वास्को पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. सोशल मीडियावरील अशा बनावट जाहिरातींपासून नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. कोणत्याही धार्मिक यात्रेसाठी किंवा ट्रॅव्हल पॅकेजसाठी पैसे देण्यापूर्वी संबंधित कंपनी किंवा व्यक्तीची योग्य प्रकारे चौकशी करणे आवश्यक आहे, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com