Online Shopping Fraud: गोलमाल है भाई सब गोलमाल है! दिवाळीत मागवला लॅपटॉप मिळाला दगडाचा तुकडा

Goa Crime News: ऑनलाईन शॉपिंगचे फॅड वाढत आहे दरम्यान, यात बऱ्याचवेळा फसवणूक होण्याचे प्रकार देखील घडतात.
Online Shopping Fraud: गोलमाल है भाई सब गोलमाल है! दिवाळीत मागवला लॅपटॉप मिळाला दगडाचा तुकडा
Goa Fraud CaseDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: डिजिटल जगात सर्वच गोष्टी ऑनलाईन उपलब्ध व्हायला लागल्या आहेत. सण- उत्सवाच्या काळात ऑनलाईन शॉपिंग करण्याची पद्धत आता नवी राहिली नाही. पण, या अतिमागणीच्या काळात फसवणूक होण्याचे प्रकार देखील वाढतात.

अशीच एक फसवणुकीची घटना गोव्यातून समोर आली आहे. दिवाळीत एकाने लॅपटॉप मागवला पण त्याला लॅपटॉपच्या बदल्यात चक्क दगड मिळाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डिचोलीतील एकाने दिवाळीच्या निमित्ताने असलेल्या ऑफरचा फायदा घेत ऑनलाईन पद्धतीने लॅपटॉप मागवला. पण, या ग्राहकाला लॅपटॉपच्या बदल्यात चक्क मार्बलचा तुकडा आल्याने तो बुचकळ्यात पडला. ऑनलाईन शॉपिंगमधून फसवणूक झाल्याने व्यक्ती चांगलाच हवालदिल झाला.

सणासुदीच्या काळात ऑनलाईन शॉपिंगवर भरगोस सूट आणि ऑफर देण्याचा प्रघात आहे. त्यामुळे विविध ऑनलाईन शॉपिंग कंपन्याची सूट आणि ऑफरसाठी चढाओढ पहायला मिळते. पण, ऑफरच्या मोहात अनेकजण फसवणुकीला बळी पडतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com