बनावट ‘ॲंटी व्हेनम’प्रकरणी FIR का नोंदवला नाही? वाल्मिकी नाईक यांचा सवाल; 2 दिवस उलटूनही पोलिसांचे दुर्लक्ष

Valmiki Naik: पणजी पोलिस एफआयआर दाखल करण्यात का अपयशी ठरले आहेत, असा सवाल आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी उपस्थित केला आहे.
Goa AAP Valmiki Naik
Goa AAP Valmiki NaikDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: आरोग्य संचालनालयाला पुरवलेल्या ‘बनावट अँटी-व्हेनम’चे प्रकरण बाहेर येऊन दोन दिवस उलटले तरीही पणजी पोलिस एफआयआर दाखल करण्यात का अपयशी ठरले आहेत, असा सवाल आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, या प्रकरणी आम्ही पोलिसांत तक्रार दिली असल्याचे त्यांनी सांगितले.

पणजी पोलिस स्थानकाच्याबाहेर रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, नोव्हेंबर २०२५ मध्ये सार्थक च्यारी या १७ वर्षीय मुलाला साप चावला होता. त्याला हळदोणा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले, तेथून त्याला म्हापशातील आझिलो इस्पितळात आणि त्यानंतर त्यास गोमेकॉत नेले, त्याठिकाणी त्याचा मृत्यू झाला.

हे प्रकरण सर्वांना सहज घडलेल्या घटनेसारखे वाटत आहे. मात्र, सार्थकचा मृत्यू खरोखरच बनावट ‘अँटी-व्हेनम’मुळे झाला का? असा सवाल उपस्थित होतो. कारण ज्यांनी ही औषधे ‘गोमेकॉ’ला पुरवली आहेत, त्यांच्यावर गुन्हा नोंद व्हायला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

Goa AAP Valmiki Naik
Mapusa Anti-Addiction Move: मद्य, तंबाखू, ड्रग्जला नकार! 360 विद्यार्थ्यांनी घेतली शपथ; म्हापशातील शाळेत उपक्रम

ज्या कंपनीने हे औषध तयार केले आहे, त्या कंपनीने आमच्याकडे हे औषध तयार केले नसल्याचे म्हटले आहे. तसेच त्या कंपनीने पोलिसांत तक्रार दिली आहे. या औषधाचे जे सिरीयल आणि बॅच नंबर दिले आहेत, त्यानुसार गोव्यात या औषधाचा पुरवठाच केला नसल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

Goa AAP Valmiki Naik
Goa Crime: शेळ्यांच्या वादातून डोक्यावर, छातीवर केला चाकूने वार; 8 वर्षानंतर आरोपीला शिक्षा, 18 दिवसांचा कारावास

ते नंबर बिहारमधील दाखवले जातात, ते नंबर गोव्यात कसे पोहोचले असा सवाल नाईक यांनी केला. एफडीएने १०८० बाटल्या ताब्यात घेतल्या असून, गोवा पोलिसांनी तात्काळ याविरोधात कारवाई करावी, अशी मागणी आम आदमी पक्षाने केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com