
पणजी : पेडणे येथे राष्ट्रीय महामार्गावर बनावट दारू वाहतूक करणाऱ्या ट्रकला अचानक आग लागली. मात्र, या दुर्घटनाग्रस्त ट्रकमधील मालाची चौकशी करण्यास उदासीनता दाखविल्याप्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी सरकारवर जोरदार टीका केली. पुढील १२ तासांत याबाबत झालेल्या कारवाईचा खुलासा न केल्यास संबंधित विभागाला घेराव घालण्याचा इशारा दिला आहे.
पत्रकार परिषदेत अमित पाटकर यांनी सांगितले की, बेकायदेशीर दारू सापडलेल्या या ट्रकबाबत ३६ तास उलटून गेले तरी कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
ट्रकमध्ये ‘एव्हरग्रीन’ नावाची मद्याची बाटली सापडली असून त्याची डिस्टिलरी गोव्यात नोंदणीकृत नाही, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिल्याचे पाटकर यांनी उघड केले. यावेळी पाटकरांनी मद्याच्या बाटलीचा फोटोही पत्रकार परिषदेत दाखवला.
राजकीय हस्तक्षेपामुळेच कारवाई नाही
या प्रकरणात एका मोठ्या नेत्याचा हस्तक्षेप होत असल्याचा आरोप करत पाटकर म्हणाले, की त्यामुळेच पेडणे पोलिस आणि एक्साईज अधिकारी कारवाईस टाळाटाळ करत आहेत. पोलिस निरीक्षक आणि एक्साईज कमिशनर यांच्याशी संपर्क साधूनही योग्य उत्तर मिळाले नाही, अशीही माहिती त्यांनी दिली.
पाटकरांनी उपस्थित केलेले प्रश्न...
1. ही दारू कुठे तयार झाली?
2. ट्रक कुणाचा आहे?
3. ‘आरटीओ’कडे ट्रकची नोंद आहे का?
4. एक्साईज आणि पोलिस यांच्यात समन्वय का नाही?
दरमहा ६०० कोटींची मद्य तस्करी
पाटकर यांनी सांगितले की, दिवसाला १० ट्रक चेकपोस्टमधून बाहेर पडतात आणि त्याचा अंदाज बांधला तर दर महिन्याला ६०० कोटी रुपयांची बेकायदेशीर दारू राज्याबाहेर जाते. याच हिशेबाने दरवर्षी ६००० कोटी रुपयांचे गैरव्यवहार होत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.