कळंगुटातून टिटोजची एक्झीट झाल्यास पर्यटनावर विपरीत परिणाम!

कळंगुटातील (Calangute) जागतिक किर्तीचे हॉटेल व्यवसायिक रिकार्डो डिसौझा (Ricardo D'Souza) (टिटोज ) (Titoz) यांनी आपला करोडोंचा व्यवसाय विक्रीस काढल्याच्या व्रुत्ताने सोमवारी संम्पुर्ण राज्यात खळबळ उडवून दिली.
Tito's
Tito's Dainik Gomantak
Published on
Updated on

कळंगुटातील (Calangute) जागतिक किर्तीचे हॉटेल व्यवसायिक रिकार्डो डिसौझा (Ricardo D'Souza) (टिटोज ) (Titos) यांनी आपला करोडोंचा व्यवसाय विक्रीस काढल्याच्या व्रुत्ताने सोमवारी संम्पुर्ण राज्यात खळबळ उडवून दिली. दरम्यान, अवघ्याशा काळात जगभरात मोठा नाव लौकीक मिळवीलेल्या टिटोजची कळंगुटातून अशाप्रकारे एक्झिट झाल्यास भविष्यात याभागातील पर्यटनावर (Tourism) त्याचा फार मोठा विपरीत परिणाम होणार असल्याची भीती याभागातील जाणकार लोकांकडून व्यक्त केली जात आहे.

कळंगुटातील किंग मेकर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका राजकीय व्यक्तीशी यासंबंधात बोलणी केली असतां, राजकारणात उतरण्याची तीव्र इच्छा असलेल्या रिकार्डो यांनी लोकांची सहानुभूती मिळवीण्यासाठी हा रचलेला बनाव असल्याचे सांगितले. दरम्यान, मुळ बामणवाडा- शिवोली (Bamanwada- Shivoli) येथील रहिवासी असलेल्या रिकार्डो याभागातील भाटकार घराण्याशी संबंधित असून त्यांच्या दिवंगत वडिलांकडून 1971 च्या दरम्यान कळंगुट-बागा येथील एका छोट्याशा गल्लीत (आजची टिटो लेन ) टिटो क्लबची (Tito Clubchi) स्थापना केली होती, कळंगुटला भेट देणाऱ्या देशी विदेशी पर्यटकांना चांगल्यापैकी मनोरंजन, न्रुत्य आणी मेजवानीचा आस्वाद देणार्या टिटोने अवघ्याशा वेळेत जगभरात नाव कमावलेले आहे.

Tito's
Goa: जागतिक किर्तीचे हॉटेल व्यवसायिक टिटोस गोवा सोडणार

परंतु सरकारी मनमानीमुळे रिकार्डो यांच्यावर स्वताचा धंदा गमावण्याची वेळ आलेली असल्यास ती एक मोठी शोकांतिकाच ठरणार असल्याचे कळंगुटातील पर्यटन व्यवसायाशी निगडीत लोकांचे म्हणणे आहे. दरम्यान, कळंगुटचे आमदार तथा राज्याचे मंत्री असलेल्या मायकल लोबो यांच्याशी याबाबतीत बोलणी केली असतां रिकार्डो डिसौझा आपले जवळचे मित्र असल्याचे सांगितले तसेच त्यांच्याकडून टिटोज व्यवसाय अद्याप पुर्णपणे विक्रीस काढलेला नसल्याचे सांगितले, त्यांनी केलेल्या सरकारी मनमानीच्या आरोपांबद्ल बोलतांना मंत्री लोबो यांनी रिकार्डो यांना अशा लोकांची नावे जाहीर करण्याचे आव्हान दिले.

प्रतिक्रिया : जोजफ सिक्वेरा : गोव्यातील (Goa) विद्यमान सरकारचा स्थानिक लोकांना संपविण्याचा पुर्वीपासूनचा कट आहे, आज टिटोज तर उद्या अन्यकुणीतरी अन्य त्यांच्या रडारवर असतील. कळंगुट आणी पर्यायाने राज्याची शान असलेला टिटोज क्लब बंद पडल्यास साहजीकच अन्य छोट्या मोठ्या व्यवसायावर पडणार असल्याने गोव्यातील संम्पुर्ण पर्यटन व्यवसायच धोक्यात येण्याची भीती आहे.

Tito's
Goa: माजी खेळाडू अजय जडेजाला 'या' चूकीसाठी ग्राम पंचायतीने केला दंड

प्रतिक्रिया : नितेश चोडणकर : ( रेंट अ केब असोशियशनचे अध्यक्ष ) : कळंगुटात सप्तरंगी मनोरंजन आणी न्रुत्याचा स्चच्छ प्रकार आणण्यात टिटोजची प्रमुख भुमिका आहे. त्यांच्या जाण्याने गोमंतकात पुन्हां एकदां अस्तित्व आणी अस्मितेचा प्रश्न उभा राहाणार आहे. राज्यातील पर्यटन मंत्र्यांनी या गोष्टीकडे लक्ष घालणे आवश्यक आहे.

प्रतिनिधी : शॉन मार्टीन्स ( सरपंच कळंगुट ) : टिटोजमुळेच कळंगुटात पर्यटन बहरले यात संशय नाही. परंतु कळंगुटातून टिटोजच्या जाण्याची कल्पना सुद्धा करणे अवघड वाटते. त्यांच्यावर अन्याय झालेला असल्यास सरकारकडून या गोष्टीची गंभीर दखल घेतली गेली पाहिजे.........

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com