शिवोली: सरकारी मनमानीमुळे हैराण आणी त्रस्त जागतिक किर्तीचे हॉटेल व्यवसायिक तसेच टिटोझ (Titos) या टोपण नावाने सर्वत्र ओळखले जाणारे मुळ बामणवाडा- शिवोली येथील रिकार्डो जोजफ डिसौझा यांनी गोवा (Goa) सरकारकडून होत असलेल्या मनमानीमुळे त्रस्त होत गोवा सोडण्याचा निर्णय घेतल्याचे व्रुत्त हाती लागले आहे.
(Goa's famous club Titos sold)
दरम्यान, रिकार्डो यांनी गोवा सोडण्याचा आपला निर्धार सामाजिक संकेत स्थळांवरून जाहीर करतांच त्यांच्या शेकडो चाहत्यांनी तीव्र नापसंती व्यक्त करीत त्यांना गोवा न सोडण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, दक्षिण गोव्यातील लोटली मतदार संघाचे माजी आमदार तथा नामवंत वकील राधाराव ग्रासियस यांनी रिकार्डो डिसौझा यांचे टिटो आणी बेतालभाटीतील मिनीनो यांनी गोव्याचे नांव साता समुद्रा पलिकडे नेण्याचे महान कार्य केल्याचे म्हटले आहे, त्यांच्यासारख्या माणसांना जर आज सरकारी मनमानी मुळे गोवा सोडावा लागत असेल तर गोवा गोव्यात नसल्याचे स्पष्ट होत असल्याचे सिद्ध होत असल्याचे आपल्या संदेशात नमूद केले आहे.
अनेकांच्या मतानुसार जागतिक किर्तीचे हॉटेल व्यवसायिक टिटो यांना सरकारी दडपणाखाली जर गोवा सोडावा लागत असेल तर येथील सामान्य गोमंतकीयांची येणाऱ्या कालावधीत कशी काय अवस्था असेल असा भयभीत प्रश्न सध्या घोंघावत असल्याचे याभागाचा दौरा केला असतां दिसून आले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.