Goa: माजी खेळाडू अजय जडेजाला 'या' चूकीसाठी ग्राम पंचायतीने केला दंड

गोव्यातील एका ग्राम पंचायतीने जडेजाला 5 हजार रुपयांचा दंड (Penalty) ठोठविला आहे.
भारताचा माजी क्रिकेटर अजय जडेजाला गोव्यातील ग्राम पंचायतीकडून दंड
भारताचा माजी क्रिकेटर अजय जडेजाला गोव्यातील ग्राम पंचायतीकडून दंड Dainik Gomantak

एल्डोना : भारताचा माजी क्रिकेटर अजय जडेजावर (Former India cricketer Ajay Jadeja) गोव्यातील एका स्थानिक ग्राम पंचायतीने 5 हजार रुपयांचा दंड (Penalty) ठोठविला आला आहे. जडेजाचा उत्तर गोव्यातील एल्डोना गावात (Aldona Village) बंगला असून, त्याने गावात कचरा (Garbage) फेकल्याने त्याला दंड लावण्यात आला आहे.

या गावच्या सरपंच तृप्ती बंदोदकर यांनी याबाबत बोलताना सांगितले, आमच्या गावात कचऱ्याचा प्रश्न अधीच बिकट बनला आहे. गावात बाहेरुन कचरा टाकण्यात येत आहे. त्यासाठी आम्ही काही युवकांची नियुक्ती केली आहे. ते कचऱ्याच्या बॅग एकत्र करुन बाहेरुन आलेला कचरा ओळखून त्याची छाननी करुन जो दोषी असेल त्याच्याविरोधात पुरावे जमा करण्याचे काम हे युवक करतात. एल्डोना गावात अनेक प्रतिष्ठीत लोकांची घरे आहेत. यात अमिताभ घोष आणि अजय जडेजा यांचेही घरे आहे.

आम्हाला कचऱ्याच्या काही बॅगांमध्ये अजय जडेजाच्या नावाची बिले मिळली आहेत. त्यामुळे त्याला आम्ही ५ हजारांचा दंड केला असून, भविष्यात त्याला कचरा फेकण्यापासून बंदी घालण्यात आली आहे. तर कोणताही गोंधळ न करता अजय जडेजाने हा दंड भरलेला असल्याचे सरपंच तृप्ती बंदोदकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com