Suresh Prabhu On Goa
पणजी: गोवा गोमंतकीयांचा आहे परंतु गोमंतकीयच गोव्यात कमी दिसतात. ज्या लोकांनी गोव्याचे गोवेपण टिकविण्यासाठी लढा दिला ते आपण राखलं पाहिजे. जपलं पाहिजे, असे मत माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी गोव्यात बोलतान व्यक्त केले. स्व. चंद्रकांत केणी पत्रकार पुरस्कार वितरण कार्यक्रमात प्रभू बोलत होते.
ज्येष्ठ पत्रकार धर्मानंद कामत यांना स्व. चंद्रकांत केणी पत्रकार पुरस्कार प्रदान करण्यात आला. केणी यांच्या जयंतीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रभू यांनी गोव्याची भाषा, संस्कृती, साहित्य, पर्यटन यासह विविध मुद्यांवर भाष्य केले. प्रत्येक राज्याची भाषा, संस्कृती टिकवण्याचे मोठे आव्हान देशासमोर आहे, असे प्रभू आपल्या भाषणात म्हणाले.
गोव्याबाबत बोलतना प्रभू म्हणाले की, 'गोव्याचे गोवेपण टिकविण्याचे आव्हान देखील गोवेकरांसमोर आहे. ते टिकविण्यासाठी काम करायला हवे. भाषा नसेल तर संस्कृती कशी सुरक्षित राहील. भाषा सुरक्षित ठेवायला हवी कारण संस्कृतीचा प्रसार हा भाषेतून होतो.'
तसेच, 'गोव्याची वाहक क्षमता किती आहे हे पाहायला हवे. निसर्ग हा गोव्याचा खूप मोठा ठेवा आहे. इथल्या स्थानिक लोकांचा विचार करायला हवा. त्यांचा शेती, बागायती, मासेमारी आणि पर्यटन हे चार मुख्य व्यवसाय आहेत. हे सर्व व्यवसाय निसर्गावर अवलंबून आहे. गोव्याचा निसर्ग टिकविणे गोव्याचा स्थानिक लोकांच्या दृष्टिकोनाने महत्त्वाचे आहे. त्यासाठी प्रयत्न करायला हवे. पुढच्या पिढीसाठी गोवा जिवंत ठेवायला हवा. गोमंतकीयांचे हृदय खूप मोठे आहे', असे सुरेश प्रभू म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.