Goa GMC: गोमेकॉसमोर विक्रेत्‍यांचे पुन्हा बस्‍तान!

Goa GMC: वाहतुकीची प्रचंड कोंडी : रुग्‍णवाहिकांचा जीव गुदमरतोय; 2021 पूर्वीची स्‍थिती
Goa GMC
Goa GMCDainik Gomantak

Goa GMC:

बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरील फळविक्रेते आणि विविध हातगाड्यांचे स्टॉल्‍स 2021 मध्ये हटविण्यात आले होते. तेथील विक्रेत्यांच्या मागणीनुसार त्यांना सरकारने दुकानेही बांधून दिली आहेत. परंतु आता पुन्हा प्रवेशद्वारासमोर फळविक्रेते, चहाचे स्टॉल्‍स थाटण्‍यात येत आहेत.

त्यामुळे या विक्रेत्‍यांचे, गाळेधारकांचे पुनर्वसन नक्की कोणासाठी झाले? हा प्रश्‍न उपस्थित होत आहे. गोमेकॉसमोर कुडका, बांबोळी, सांताक्रुझ परिसरातील विक्रेत्यांची विविध दुकाने होती. परंतु गोमेकॉ प्रशासनाने त्‍याविरोधात आवाज उठविला होता. ही दुकाने वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरतात.

अनेकदा वाहतूक कोंडीमुळे गोमेकॉत येणाऱ्या रुग्णवाहिका अडकून पडतात असे त्‍यांचे म्‍हणणे होते. त्यामुळे २०२१ मध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गोमेकॉ प्रवेशद्वारासमोरील गाडे व विक्रेत्यांना हटविण्यात आले होते.

Goa GMC
Goa Comunidade: माजी ॲटर्नी परेरांवर एफआयआर नोंदवा

त्यावेळी या विषयाचे राजकारणही झाले होते. शिवाय विक्रेत्यांनी एक महिना ठिय्या आंदोलन छेडले होते. या आंदोलनानंतर त्‍या विक्रेत्यांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार या विक्रेत्यांना गोमेकॉच्या जागेत सार्वजनिक बांधकाम खात्याने गाळे बांधूनही दिले.

पादचाऱ्यांचा जीव आलाय धोक्‍यात

विक्रेत्यांचे पुनर्वसन झाल्यानंतर काही महिने नव्या जागेत व्यवसाय सुरू राहिला. परंतु आता गोमेकॉसमोरील मंदिर परिसर आणि प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला फळविक्रेते, शहाळेविक्रेते, चहाविक्रेत्यांचे स्टॉल्‍स उभे राहिले आहेत.

पुन्हा प्रवेशद्वारासमोर ठिय्या मांडून व्यवसाय सुरू झाल्याने वाहनचालक किंवा गोमेकॉत येणारे लोक या ठिकाणी गर्दी करतात. कुजिराकडून वाहने गोमेकॉच्या दिशेने आणताना भुयारीमार्गाचा वापर करावा लागतो.

Goa GMC
Accident Case: अंकित त्रिपाठीचा नव्याने जामीन अर्ज; उद्या सुनावणी

भुयारीमार्ग प्रवेशद्वारासमोरील रस्त्याला जोडला असल्याने या ठिकाणी येजा करणाऱ्या पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागतो.

पंचायतीच्या सूचनांकडे पूर्ण दुर्लक्ष

सांताक्रुझ पंचायतीकडून गोमेकॉ परिसरातील विक्रेत्यांना वारंवार समज देण्यात आली आहे. तरीही हे विक्रेते तेथून हटत नाहीत.

मिळालेल्या माहितीनुसार, आता पंचायतीने याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.

गोमेकॉचा प्रवेशद्वार परिसर खरेतर वाहनांसाठी पूर्णपणे मोकळा हवा, परंतु विक्रेत्यांमुळे हा परिसर सकाळी आणि संध्याकाळी वाहनांमुळे दाटीवाटीचा दिसून येतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com