विद्युत उपकरणे
विद्युत उपकरणे Dainik Gomantak

Goa: घोटेली-सत्तरीत विजेच्या उच्च दाबामुळे विद्युत उपकरणे निकामी

गेल्या महिन्यात घोटेली (Ghoteli) 2 व केरी सत्तरी (Keri Sattari) परिसरात विजेच्या उच्च दाबामुळे अनेकांची विजेची उपकरणे निकामी झाली होती.
Published on

गेल्या महिन्यात घोटेली (Ghoteli) 2 व केरी सत्तरी (Keri Sattari) परिसरात विजेच्या उच्च दाबामुळे अनेकांची विजेची उपकरणे निकामी झाली होती. तसाच प्रकार गुरुवारी रात्री येथे घडल्याने या भागातील लोकांची मोठी नुकसान झाली आहे. गुरुवारी रात्री घोटेली भागात विजेचा उच्च दाब (high voltage) आल्याने कुष्ठा लक्ष्मण गावस, सागर सीताराम गावस, देवेंद्र गावस, सातू गावस, प्रमोद गावस, नारायण गावस, रोहन गावस, निळकंठ गावस, नरेंद्र गावस, नितेंद्र गावस, दीपक गावस इत्यादीच्या घरातील टीव्ही रिसिव्हर, बल्ब, इंडक्शन, पंखे, टीव्ही, आदी उपकरणे जळून निकामी झाली आहे. त्यामुळे त्यांना लाखोंची नुकसान झाली आहे. गेल्या महिन्यात यातील बऱ्याच जणांच्या नुकसानी झाल्या होत्या, त्यांना यावेळेसही मोठा फटका बसला.(Electrical equipment fails due to high voltage in Ghoteli-Sattari)

विद्युत उपकरणे
Goa: "साखळी पालिका कामगारांची छळवणूक होतेय"

ही घटना घडल्यावर स्थानिक पंच सदस्य लक्ष्मण गावस (Laxman gawas) यांनी बऱ्याच जणांच्या घरी जाऊन पाहणी केली. केरीतील विजेच्या समस्येवर आम्ही तक्रार केल्याचे सांगितले. पण वीज खात्याकडून यावर दुर्लक्ष करीत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान अशा या प्रकाराबद्दल स्थानिकांनी वीज खात्याशी तक्रार नोंदवली आहे. मागच्या वेळेस जेव्हा अशी तक्रार केली होती पण त्यावर वीज खात्याने नुकसान भरपाई दिली नसल्याचे देवेंद्र गावस (Devendra Gawas) सांगितले तेव्हा सरकारच्या या नाकर्तेपणामुळे नाराजी व्यक्त केली.

दरम्यान या महिन्याभरात सलग दोन वेळा असा विजेचा उच्च दाब आल्याने यांची कारणे शोधून त्यावर काम करावे जेणेकरून भविष्यात अशा घटना घडणार नाही अशी मागणी देवेंद्र गावस यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com