E-Buses in Panaji: राजधानी पणजीत लवकरच सुरू होणार ई-बसेस; बसेसमध्ये असणार अत्याधुनिक सुविधा

E-Buses in Panaji: सध्या राज्यात 37 वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धा संपल्यानंतर लगेचच पणजी शहर आणि शहरानजीकच्या भागात ई-बसेस सेवा सुरू करण्यात येणार आहे.
E-Buses Service in Panaji City
E-Buses Service in Panaji CityDainik Gomantak
Published on
Updated on

E-Buses Service in Panaji City: राजधानी पणजीत इलेक्ट्रिक बसेस सुरू करण्याचा मुद्दा बऱ्याच कालावधीपासून रखडला होता. याबाबत परिवहन मंत्री माविन गुदिन्हो यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

सध्या राज्यात 37 वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धा संपल्यानंतर लगेचच पणजी शहर आणि शहरानजीकच्या भागात ई-बसेस सेवा सुरू करण्यात येणार आहे.

कदंब व्यवस्थापनाच्या 43 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

E-Buses Service in Panaji City
Goa Schools: गोव्यात हायस्कूलमध्ये आता शिकवली जाणार सांकेतिक भाषा; पर्यायी विषय म्हणून निवडण्याची संधी

ते पुढे म्हणाले की, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा संपल्यानंतर लवकरच पणजी आणि शहराच्या नजीकच्या भागात कदंब व्यवस्थापना अंतर्गत इलेक्ट्रिक बसेस सुरू करण्यात येणार आहेत.

तसेच परिवहन विभागाच्या ताफ्यात इतर 50 डिझेल बसेसचीही भर घालण्याचा विचार सुरू आहे.

पणजीत सुरू होणाऱ्या बसेसमध्ये रिअल-टाइम ट्रॅकिंग, क्यूआर कोड पेमेंट सिस्टम आणि अनेक आधुनिक सुविधा असणार आहेत.

दुसरीकडे, राज्यातील सार्वजनिक वाहतूक अधिक सुरळीत आणि सोपी करण्यासाठी परिवहन विभाग कार्यरत असल्याचे गुदिन्हो यांनी सांगितले.

यासाठी 'माझी बस' अंतर्गत खाजगी बसदेखील याचा भाग असणार आहेत.

सार्वजनिक वाहतुकीचे महत्त्व ओळखून कदंबचे व्यवस्थापक उल्हास तुयेकर यांनी मुख्यमंत्र्यांना 200 बसेसचे वाटप करण्याचे आवाहन केले आहे. यावेळी राज्यात परिवहन सेवांमध्ये लक्षणीय सुधारणा होईल, अशी आशा मंत्री माविन गुदिन्हो यांनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com