Goa Schools: गोव्यात हायस्कूलमध्ये आता शिकवली जाणार सांकेतिक भाषा; पर्यायी विषय म्हणून निवडण्याची संधी

Indian Sign Language in Goa High Schools: हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना विज्ञान, वाणिज्य आणि कला या मुख्य विषयांसह त्यांच्या आवडीचे पर्यायी विषय निवडण्याची सोय असते.
Indian Sign Language in Goa High Schools:
Indian Sign Language in Goa High Schools:Dainik Gomantak

Indian Sign Language in Goa High Schools: गोव्यातील हायस्कूलमध्ये आता सांकेतिक भाषा शिकवली जाणार आहे.

गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (GBSHSE) राज्यातील सर्व शाळांमधील उच्च माध्यमिक शाळांमध्ये 7 वा पर्यायी विषय म्हणून सांकेतिक भाषा शिकवण्याचा निर्णय घेतला आहे.

हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना विज्ञान, वाणिज्य आणि कला या मुख्य विषयांसह त्यांच्या आवडीचे पर्यायी विषय निवडण्याची सोय असते.

आत्तापर्यंत, गोव्यातील 30 शाळांनी 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून भारतीय सांकेतिक भाषा (ISL) हा पर्यायी विषय म्हणून स्वीकारण्याची हमी दिली आहे. तसेच, गोवा असोसिएशन फॉर द डेफने 50 शिक्षकांना आयएसएल शिकवण्यासाठी ओरिएंटेशन प्रोग्राम आणि प्रशिक्षण दिले आहे.

ISL अभ्यासक्रम जानेवारी 2024 पर्यंत तयार होईल आणि शैक्षणिक सत्र 2024-25 पासून, इयत्ता 9वीचे विद्यार्थी आयएसएलला पर्यायी विषय म्हणून घेऊ शकतील.

येत्या काही वर्षांत दहावीमध्येही हा विषय ऐच्छिक म्हणून समाविष्ट करण्याची तयारी सुरू आहे. सध्या प्रत्येक शाळेत किमान एक ISL शिक्षक असेल, असे बोर्डाचे अध्यक्ष म्हणाले.

गोवा असोसिएशन फॉर द डेफचे सदस्य राहुल कुंकळ्ळीकर गोव्याचे पहिले RCI प्रमाणित ISL शिक्षक आहेत. राहुल हा आरटीओ कार्यालयात एलडीसी अधिकारी म्हणून कार्यरत आहे. राहुल गोव्यात आयएसएल प्रशिक्षण आणि कार्यशाळाही घेतात.

गोव्यात कर्णबधिर मुलांसाठी पाच समर्पित शाळा आहेत. NEP, 2020 अंतर्गत, मुलांना नियमित शाळेतही अभ्यास करणे सोपे व्हावे यासाठी सांकेतिक भाषा हा अभ्यासक्रमाचा भाग बनवण्यात येत आहे.

23 सप्टेंबर 2021 रोजी आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिनानिमित्त केंद्र सरकारने शाळांमध्ये सांकेतिक भाषा शिकवण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी पंतप्रधान मोदींनी सांकेतिक भाषेच्या 10,000 शब्दांच्या शब्दकोशाचे प्रकाशनही केले.

2011 च्या जनगणनेनुसार, देशातील 50,70000 कर्णबधिर मुलांपैकी फक्त 5 टक्के नियमित शाळेत जाऊ शकतात आणि फक्त 1 टक्के शिक्षण घेऊ शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com