Goa Taxi : स्वतंत्र टॅक्सी काऊंटरसाठी दिली आठ दिवसांची मुदत

आज निवेदन देणार : मोपा विमानतळावरील पेच अजून कायम
Goa Taxi |Manohar International Airport
Goa Taxi |Manohar International AirportDainik Gomantak

मोपा विमानतळावर पेडणेतील स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांसाठी स्वतंत्र टॅक्सी काऊंटरची मागणी केल्यास पाच महिने उलटून गेले. सरकार गंभीरपणे हा विषय हाताळत नसल्याने टॅक्सी व्यावसायिक आक्रमक झाले असून, येत्या आठ दिवसांत टॅक्सी काऊंटर सुरू करावे.

वाहतूक खात्याचे संचालक संजय सातार्डेकर हे याबाबत वेळकाढू धोरण अवलंबित असल्याने त्यांना निलंबित करावे, अशी मागणी पेडणे तालुका नागरिक समिती, ग्रीन फिल्ड टॅक्सी असोसिएशन व समविचारी नागरिकांनी केली.

Goa Taxi |Manohar International Airport
Vijay Sardesai : आतापर्यंतचे अर्थसंकल्प हे अर्थहीन : विजय सरदेसाई

तशा आशयाचे निवेदन सोमवार, 27 रोजी देण्यात येणार आहे. पेडणे नागरिक समिती, ग्रीन फिल्ड टॅक्सी असोसिएशन यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी भारत बागकर म्हणाले, मोपा विमानतळाबाबत सरकारने पेडणेवासीयांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.

वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी विमानतळ सुरू होण्यापूर्वी टॅक्सी काऊंटरची प्रक्रिया सुरू करायला हवी होती. त्यामुळे वाहतूकमंत्री गुदिन्हो आणि वाहतूक संचालक सातार्डेकर यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, असे बागकर म्हणाले.

Goa Taxi |Manohar International Airport
Panaji Municipal Corporation : पणजी महानगरपालिकेचे अंदाजपत्रक आज

प्रसंगी आंदोलन छेडणार

हे विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू झाले असून पेडणेतील टॅक्सी व्यावसायिकांची मागणी गेले पाच महिने प्रलंबित आहे. ती मागणी धसास लावल्याविना स्वस्थ बसणार नाही. प्रसंगी आंदोलन छेडले जाईल, असे ग्रीन फिल्ड टॅक्सी असोसिएशनचे अध्यक्ष उदय महाले म्हणाले. यावेळी संजय आरोसकर, ॲड. प्रसाद शहापूरकर, नंदकुमार मावळणकर उपस्थित होते.

खासगी सेवेस मुभा द्या!

नारूलकर म्हणाले, सरकारने पेडण्यातील टॅक्सी व्यावसायिकांची घोर निराशा केली आहे. टॅक्सी काऊंटरचे आश्वासन अद्याप सत्यात उतरलेले नाही. त्यामुळे आम्हाला पुन्हा एकदा रस्त्यावर उतरावे लागेल.

ब्ल्यू कॅब काळ्या-पिवळ्या टॅक्सीसाठी काऊंटर होत नाही, तोपर्यंत खासगी टॅक्सी सेवेस मुभा द्यावी. कारण मोपासाठी ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत, त्यांना अद्याप भरपाई दिलेली नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com