Vijay Sardesai : आतापर्यंतचे अर्थसंकल्प हे अर्थहीन : विजय सरदेसाई

भाजप सरकार बनले ‘इव्हेंट मॅनेजर’; मनमानी कारभार
Vijay Sardesai
Vijay SardesaiDainik Gomantak
Published on
Updated on

Vijay Sardesai on Goa Budget Session: दरवर्षी मांडण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पाकडे गोमंतकीयांची नजर लागून राहिलेली असते. मात्र, अर्थसंकल्प मांडून त्यावर चर्चा न करण्याची प्रथा भाजप सरकारने सुरू केली आहे. हे लोकशाही नियंत्रित करणाऱ्यांचे इव्हेंट मॅनेजर सरकार आहे.

जनतेने या सरकारचे फक्त ऐकावे. कोणतीही चर्चा करण्यास ते तयार नाहीत. त्यामुळे दरवर्षी अर्थसंकल्प अर्थहीन बनल्याची टीका गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी केली.

Vijay Sardesai
Virus Alert : वाढत्या संसर्गामुळे राज्यांनी सतर्क राहावे!

पणजीतील पत्रकार परिषदेत आमदार सरदेसाई म्हणाले की, हे सरकार पूर्णत: अपयशी ठरले आहे. अर्थसंकल्पापूर्वी काही घटकांना बोलावून त्यांच्या इच्छा ऐकण्याचा फार्स केला. पण हे सरकार स्वत:ला जे हवे तेच करते.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे इतर मंत्र्यांना विश्‍वासात घेत नाहीत. त्यांनी मागील अर्थसंकल्पात जाहीर केलेली ई-वाहनांसाठी सवलत देण्याची 5 वर्षांसाठी अनुदानाची घोषणा एका वर्षातच बारगळली.

या योजनेसाठी अर्थसंकल्पात 20 कोटींची तरतूद केली होती. देशभर ही योजना सुरू आहे. मात्र, राज्याच्या तिजोरीत खडखडाट असल्याने ती बंद केली.

निवडणुकीपूर्वी गरीब कुटुंबांना तीन मोफत गॅस सिलिंडर देण्याची घोषणा केली होती. तिची पूर्तता अद्याप केलेली नाही. अर्थसंकल्पात मंजूर केलेल्या निधीचा वापर इतर प्रकल्पांसाठी केला आहे.

Vijay Sardesai
Bicholim By-Elections: वन-म्हावळींगेतून शाहू वरक, वेळगेतून सर्वेश घाडी विजयी

केंद्राच्या योजनांची गोव्यात कॉपी

मुख्यमंत्र्यांची कार्यपद्धती एखाद्या आकाशवीरासारखी आहे. केंद्रातून एखादी योजना आली की ती नव्या नावाने गोव्यात सुरू करतात. ‘मन की बात’ऐवजी ‘गोवा की बात’ त्यांनी सुरू केली. सर्वांनी त्यांचे ऐकावे, अशी त्यांची अपेक्षा असते.

त्यांनी मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांवर नियंत्रण ठेवले आहे. या सरकारकडे राज्याच्या विकासाठीच्या दृष्टीचा, नियोजनाचा अभाव आहे. मंत्र्यांकडे फक्त भडक विधानांशिवाय काहीच नाही, अशी टीका सरदेसाई यांनी केली.

गोवा फॉरवर्ड पक्षाच्या प्रश्नांचा सारांश

  • 12 तारांकित प्रश्‍न

  • 60 अतारांकित प्रश्‍न

  • 4 लक्ष्यवेधी सूचना

  • 4 शून्य तासावेळी प्रश्‍न

  • 1 खासगी विधेयक ठराव

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com