गोव्याचे पर्यटन 'पथदर्शी' आराखड्यासाठी प्रयत्न

मंत्री रोहन खंवटे: अर्थव्यवस्था, रोजगाराच्या संधी उपलब्ध करू
Rohan Khaunte
Rohan Khaunte Dainik Gomantak 
Published on
Updated on

पणजी: राज्यातील खाणी बंद झाल्यानंतर पर्यटन हा राज्याच्या महसुलाचा कणा बनला आहे. त्यामुळे पर्यटनासाठी पथदर्शी आराखडा तयार करण्याचा तसेच जागतिक दर्जाचे स्थळ नावारूपास आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आयटी माध्यमाचा त्यासाठी उपयोग केला जाईल. या दोन्ही खात्यांमधून रोजगार व अर्थव्यवस्थेकडे अधिक लक्ष दिले जाणार असल्याचे मत पर्वरीचे आमदार तथा पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी आज पर्वरीतील सचिवालयात कार्यालयाचा ताबा घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

कोविड काळात पर्यटनावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे भाजप सरकारकडून लोकांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. पर्यटन हा महसुलाचा मुख्य स्रोत असल्याने पर्यटन व्यावसिकांचे लक्ष या खात्याकडे लागले आहे. राज्यात दर्जात्मक व चांगले पर्यटक आणण्यासाठी प्रयत्न राहणार आहे. त्यासाठी पुढील 15 ते 20 वर्षांसाठीचा पर्यटन पथदर्शी आराखडा तयार करण्याची गरज आहे. सरकारकडून मिळालेल्या खात्यांसंदर्भात येत्या काही दिवसांत मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा होणार आहे. त्यावेळी राज्यासाठी असलेल्या योजनेसंदर्भात चर्चा केली जाईल, असे खंवटे यांनी सांगितले.

Rohan Khaunte
कृषिमंत्री रवी नाईकांना ‘हेरंब’ पावला!

माहिती तंत्रज्ञान हे खाते माझ्याकडे आहे. यापूर्वी मंत्री असताना या खात्यामधून अनेक विविध प्रकारचे रोजगारनिर्मित योजना पुढे आणल्या होत्या. राज्यासाठी स्टार्टअप धोरण पुढे आणले होते. आता आयटीच्या माध्यमातून पर्यटनाला कशाप्रकारे चालना मिळू शकेल या दिशेने पुढील पावले उचलली जाणार आहेत. आयटी खात्यात अडीच वर्षे मंत्री असताना जे काही केले होते त्याचे पुढे काय झाले त्याचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेणार आहे. कोविड काळामध्ये कनेक्टिव्हिटी जो त्रास झाला हा सर्वश्रुत आहे. त्यामुळे राज्याच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये फायबर कनेक्टिव्हिटी पोहचवण्यासाठी प्रयत्न केले जातील. पर्यटन व आयटी या दोन्ही खात्याच्या माध्यमातून युवा पिढीला स्वयंरोजगार तसेच स्टार्टअप धोरणामधून रोजगारनिर्मिती करण्यासाठी सहाय्य केले जाईल, असे खंवटे यांनी स्पष्ट केले.

Rohan Khaunte
Goa Weather Updates: राज्यात आज, उद्या पाऊस पडण्याची शक्यता

स्वयंरोजगारासाठी करणार जनजागृती

पर्यटन व आयटी या दोन्ही खात्यामध्ये रोजगारनिर्मिती तसेच स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी चांगल्यापैकी संधी आहे व त्या संधीचा फायदा युवा पिढीला उठवण्यासाठी त्यांच्यामध्ये जनजागृती केली जाईल. राज्यात मोठ्या प्रमाणात चांगल्या दर्जाचे पर्यटक यावेत यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न केले जातील. पर्यटन क्षेत्रावर गोव्यातील अनेक व्यवसाय अवलंबून आहेत व त्यासाठीच सरकारतर्फे पर्यटनसाठी भविष्याच्या दृष्टीने अनेक योजना व निर्णय सरकारच्या मदतीने घेतले जातील, असे रोहन खंवटे यांनी आज कार्यालयाचा ताबा घेतल्यानंतर स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com