कृषिमंत्री रवी नाईकांना ‘हेरंब’ पावला!

गोष्ट बंगल्याची: ढवळीकरांनी बांधलेल्या घरात आता कट्टर विरोधक नाईक राहणार
Ravi Naik
Ravi NaikDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: मंत्रिमंडळातील मंत्र्यांना आणि सचिवांना राज्याची राजधानी पणजीत राहता यावे यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीने आल्तिनो येथील सुसज्ज बंगले वितरित करण्यात येतात. यातील सर्वात चर्चेचा बंगला म्हणजे मुख्यमंत्री निवासस्थानासमोर ‘हेरंब’ हा होय. या बंगल्यासाठी अनेक मंत्र्यांची मागणी असते. अलीकडच्या काळात मात्र सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्रीच या बंगल्यात राहत असे. या परंपरेला छेद देत आता कृषिमंत्री रवी नाईक यांनी हा बंगला सर्वात पहिल्यांदा आपल्या पदरात पाडून घेतला आहे. अर्थात रवी नाईक आणि या बंगल्याचं नातही जुनेच आहे.

Ravi Naik
Goa Updates: आठपैकी केवळ दोनच मंत्र्यांनी स्वीकारला पदभार

आमदार सुदिन ढवळीकर कॉन्ट्रॅक्टर असताना त्यांनीच हा बंगला बांधला होता. विशेष म्हणजे मंत्री झाल्यावरही ते पहिल्यांदा याच बंगल्यामध्ये राहावयास आले. त्यामुळे त्यांचे या बंगल्याशी असलेले जिव्हाळ्याचे नाते समजून येते. मात्र, त्यांचे कट्टर राजकीय शत्रू रवी नाईक यांनाही हा बंगला विशेष आवडतो. मागे गृहमंत्री असताना ही काही दिवस ते या बंगल्यामध्ये होते. त्यामुळे अंत्रुज महालातील या दोन मातब्बर ज्येष्ठ नेत्यांच्या दृष्टीने हा बंगला जास्त महत्त्वाचा आहे. यापूर्वी सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पावस्कर येथे होते.

Ravi Naik
महागाईचा भडका; दरवाढीविरोधात गोवा नागरिकांनी व्यक्त केला संताप

दरम्यान, सुदिन ढवळीकर यांना मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळेल अशी एक चर्चा आहे. यदाकदाचित मंत्रिपद मिळाल्यानंतर ढवळीकर ‘हेरंब’कडे जातील अशी शक्यता आहे. ढवळीकर आणि रवी नाईक हे दोघेही गणपतीचे भक्त आहेत. रवी नाईक यांच्याकडे तर गणपतीच्या शेकडो मूर्त्या आहेत. त्यामुळेच पुन्हा रवी नाईक यांनी हा ‘हेरंब’ बंगला सर्वात पहिल्यांदा आपल्या पदरात पाडून घेतला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

42 Percent Cooperative Societies Closed
PM Matsya Sampada Yojana Goa
NEP Implementation In Goa
Yuri Alemao Opposition Criticism
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com