ED Raid: गोव्यासह इतर 20 ठिकाणी 'ईडी'चे छापे, 400 हून अधिक बँक खाती गोठविली; रोख रक्कम, परदेशी चलन आणि सोन्यासह कोट्यवधी रुपयांचा ऐवज जप्त

ED Raid Goa: डिजिटल अटकेच्या नावाखाली ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या देशव्यापी टोळीविरोधात अंमलबजावणी संचालनालयाने मोठी कारवाई केली आहे.
ED Raid Goa
ED Raid GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: डिजिटल अटकेच्या नावाखाली ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या देशव्यापी टोळीविरोधात अंमलबजावणी संचालनालयाने मोठी कारवाई केली आहे. पणजी विभागीय अंमलबजावणी संचालनालयाने मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि गोव्यात मिळून २० वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले.

या छापेमारीत रोख रक्कम, परदेशी चलन आणि सोन्यासह एकूण कोट्यवधी रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला असून ४०० हून अधिक बँक खाती गोठविण्यात आली आहेत.

संशयितांविरोधात नोंदविलेल्या ‘एफआयआर’च्या आधारे ‘ईडी’ने हा तपास हाती घेतला होता. हा घोटाळा बनावट कंपन्यांच्या मोठ्या जाळ्याद्वारे चालविला जात असल्याचे तपासात उघड झाले आहे.

ED Raid Goa
Goa Heritage: विस्मृतीत गेलेला भिरोंड्याचा इतिहास

या छाप्यांद्वारे ८० लाख रुपयांची रोख रक्कम तसेच १ कोटी २४ लाख रुपयांचे परदेशी चलन, १ कोटी ३० लाख रुपये किमतीचे सोने, सुमारे १४ कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्तांची कागदपत्रे, फसवणुकीचे पैसे वळविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सुमारे १०० बनावट कंपन्यांचे रबरी शिक्के आणि या संपूर्ण नेटवर्कशी संबंधित तब्बल ४०० बँक खाती ‘ईडी’नेगोठविली आहेत.

ED Raid Goa
Goa Heavy Rain: पावसाच्या पुनरागमनाने बळीराजा सुखावला, पण सत्तरीत ढगफुटीसदृश पावसामुळे रस्ते जलमय, जनजीवन ठप्प

मुख्य सूत्रधाराचा तपास सुरू: डिजिटल अटकेचे भय दाखवून सर्वसामान्य नागरिकांना कोट्यवधी रुपयांना गंडा घालणारे हे नेटवर्क अत्यंत संघटित पद्धतीने काम करत होते. या देशव्यापी रॅकेटचा मुख्य सूत्रधार कोण आहे, याचा शोध घेण्यासाठी ‘ईडी’कडून पुढील तपास चक्राकार गतीने सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com