Goa Fraud Case: बनावट सही करून मालमत्ता हस्‍तांतरित

Goa Fraud Case: बनावट सहीद्वारे बोगस कागदपत्रे सादर करून कोट्यवधी रुपयांची संपत्ती परस्‍पर हस्तांतरित केल्याचे एक प्रकरण मडगावजवळील शिर्ली परिसरात उघडकीस आले आहे.
Watch Fraud
Watch Fraud Dainik Gomantak

Goa Fraud Case: बनावट सहीद्वारे बोगस कागदपत्रे सादर करून कोट्यवधी रुपयांची संपत्ती परस्‍पर हस्तांतरित केल्याचे एक प्रकरण मडगावजवळील शिर्ली परिसरात उघडकीस आले आहे. मडगाव पोलिसांनी संशयिताविरोधात गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणी थेल्मा व्हिएगस या फिर्यादी आहेत. पोलिसांनी प्राथमिक चौकशीनंतर भादंसंच्‍या ४६५, ४६८, ४७१ व ४२० कलमांखाली गुन्हा (क्रमांक १०३/२०२३) नोंद केला आहे.

Watch Fraud
Vishwakarma Yojana: 10 केंद्रांवर विश्‍वकर्मा प्रशिक्षण

फातोर्डा परिसरात राहणाऱ्या एका संशयिताचे नाव या महिलेने पोलिसांना दिले असून तपास सुरू करण्‍यात आला आहे. त्‍याने तक्रारदार महिलेची बनावट सही तयार केली, ती सही विविध कागदपत्रांवर मारली आणि ती खरी असल्याचे भासवले.

शेअर सर्टिफिकेटवर नाव टाकले बदलून

थेल्मा व्हिएगस या महिलेच्या नावावर जमिनीचे दोन प्‍लॉट होते. बनावट पॉवर ऑफ अॅटर्नीच्या कागदपत्रांच्या आधारे दोन्ही प्लॉटसंबंधी ‘डीड ऑफ गिफ्ट’ तयार केले. इतकेच नव्हे तर तक्रारदार महिला व तिच्या मुलीच्या नावे ५० लाख रुपये किमतीचे शेअर सर्टिफिकेट होते. त्‍यावरील नावही बदलण्यात आले. या अफरातफरीबाबत तक्रारदाराला कल्पना आली तेव्हा तिने पोलिसांत धाव घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com