E-Challan: 'तालांव कट, पावती गायब' ई-चलन यंत्रणेत वारंवार बिघाड; पोलिस आणि वाहनचालक हैराण

Digital Fine Glitches: तांत्रिक बिघाड झाल्याने वाहनचालक आणि वाहतूक पोलिस कर्मचारी दोघांनाही मनस्ताप सहन करावा लागतोय
vehicle fine disputes goa
vehicle fine disputes goa Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोवा पोलिसांच्या ई-चलान प्रणालीत पुन्हा एकदा तांत्रिक बिघाड झाल्याने वाहनचालक आणि वाहतूक पोलिस कर्मचारी दोघांनाही मनस्ताप सहन करावा लागतोय. पैशांची कपात होऊनही चलन तयार न झाल्याने हे प्रकरण आता गंभीर वळणावर पोहोचले आहे.

...पण चलन तयार होत नाही

वाहतूक पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनेक वाहनचालकांनी पैसे भरूनही त्यांना चलन मिळत नाहीये आणि सध्या अशा तक्रारींमध्ये बरीच वाढ झाली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनाही या बिघडलेल्या यंत्रणेमुळे वाहनचालकांच्या रोषाला सामोरे जावे लागतेय.

vehicle fine disputes goa
E-challan: महत्वाची बातमी! ... तोपर्यंत ई-चलनची अंमलबजावणी होणार नाही, माविन गुदिन्हो यांनी सांगितले कारण

"वाहनाच्या मालकाच्या खात्यातून पैसे वजा होतात, पण चलन तयार होत नाही. एसएमएसद्वारे पुष्टीकरण मिळते, हे आम्ही त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतो, पण अनेकजण अधिकृत कागदपत्र म्हणून प्रतच मागतात," असं वाहतूक पोलीस सांगतायत. 

सध्या दंड म्हणून लोकांच्या खात्यातून पैसे वजा होतात, पण चलन तयार होत नाही. यामुळे लोकं पोलिसांशी भांडतायत, कारण त्यांना अधिकृत कागदपत्र म्हणून छापील पावती हवी आहे. मशीनमध्ये "अपलोड स्थिती: प्रलंबित" असं दाखवतं, म्हणजे पावती तयार व्हायला पाहिजे पण तसं होत नाहीये. पोलिसांनी या तांत्रिक अडचणी लवकरच सोडवण्याचे आश्वासन दिले आहे.

२०२३ मध्येही याच यंत्रांमध्ये समस्या

डिचोलीमधील एका महिला पोलिस कर्मचाऱ्याने पैसे खाल्ल्यामुळे चलन ऑनलाईन करायचे ठरवले होते. ऑगस्ट २०२३ मध्ये, "सॉफ्टवेअर बग" किंवा "हार्डवेअर बिघाड" असल्याचे वाहतूक विभागाने मान्य केले होते. एकाच वेळी अनेक ठिकाणी ऑटोमॅटिक अँड्रॉइड ई-चलान यंत्रे लॉग इन होत असल्याचा प्रकार समोर आल्यानंतर हे उघडकीस आले होते. वारंवार होणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे या प्रणालीच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com