E-challan: महत्वाची बातमी! ... तोपर्यंत ई-चलनची अंमलबजावणी होणार नाही, माविन गुदिन्हो यांनी सांगितले कारण

शहरातील 30 ट्रॅफिक जंक्शनवर एआय तंत्रज्ञान कार्यान्वित केले जाणार असल्याची माहिती देण्यात आलीय
Mauvin Godinho About E-challan
Mauvin Godinho About E-challan dainik gomantak

Mauvin Godinho About E-challan: गोव्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास लवकरच वाहनचालकांना चलन ई पद्धतीने थेट मोबाईलवर मिळणार असल्याची सूचना चार दिवसांपूर्वी देण्यात आली. यासाठी शहरातील 30 ट्रॅफिक जंक्शनवर एआय तंत्रज्ञान कार्यान्वित केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली. चार मे रोजी वाहतूक खात्याने याबाबत आदेश दिले होते.

दरम्यान, परिवहन मंत्री माविन गुदिन्हो यांनी तात्काळ ई-चलनची अंमलबजावणी होणार नाही. अशी माहिती दिली आहे.

काय म्हणाले परिवहन मंत्री माविन गुदिन्हो?

नव्याने कार्यान्वित होणाऱ्या ई-चलन प्रणालीबद्दल लोकांना जोपर्यंत पूर्ण माहिती मिळत नाही. लोक याबाबत जागृत होत नाही तोपर्यंत ही प्रणाली लागू केली जाणार नाही. असे माविन गुदिन्हो म्हणाले.

दरम्यान, गोव्यातील वाहतूक सुरक्षित आणि सुरळीत करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने विविध प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्याच्याच माध्यमातून ई-चलन प्रणाली कार्यान्वित केली जाणार आहे. दरम्यान, लोकांमध्ये पुरेशी जागृकता निर्माण होत नाही तोपर्यंत ही सुरू केली जाणार नसल्याचा निर्वाळा गुदिन्हो यांनी दिल्याने वाहनचालकांना काही काळासाठी शिक्षित व्हायला अवधी मिळणार आहे.

Mauvin Godinho About E-challan
Goa Traffic Police: गोव्यात वाहतूक नियमांची कडक अंमलबजावणी, नियमभंग केल्यास आता थेट मोबाईलवर चलन

येथे असेल यंत्रणा

  • दिवजा सर्कल,

  • कस्टम हाऊस जंक्शन,

  • फेरीबोट जंक्शन,

  • कला अकादमी जंक्शन,

  • सायन्स सेंटर मिरामार,

  • सेंट मायकल स्कूल ताळगाव रोड

  • गोवा विद्यापीठ दोना पावल रोड,

  • मेरशी जंक्शन

(बार्देश तालुक्यातील चार ठिकाणी ही प्रणाली कार्यान्वित होणार आहे.)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com