गोवा: दरवर्षी नरकासुराच्या मिरवणुकीत वाजवल्या जाणाऱ्या मोठाल्या आवाजामुळे स्थानिकांना त्रास सहन करावा लागतो. याच मोठमोठाल्या संगीतामुळे वृद्धलोकांना त्रास होत असल्याची तक्रार सांतिनेज मधल्या एका व्यक्तीने मानवी हक्क आयोगाकडे (Human Rights Commission) केली.
तक्रारीची नोंद घेत मानवाधिकार आयोगाने नरकासुर दहन करणाऱ्या सर्व गटांना नरकासुराच्या मिरवणुकीत तसेच दहनाच्यावेळी संगीताचे आवाज कमी ठेवण्याचे आदेश दिले आहेत. महत्वाची बाब म्हणजे या नरकासुर मिरवणुकीच्या दरम्यान होणाऱ्या आवाजावर आता पोलीस लक्ष ठेवणार आहेत.
दिवाळी सणाच्या अगोदरच्या रात्री राज्यात अनेक भागांमध्ये नरकासुराची मिरवणूक निघते. नरकासुराचे दहन हा गोव्यातील संस्कृतीचा महत्वपूर्ण भाग आहे. मात्र निरवणुकीतल्या मोठमोठाल्या आवाजामुळे स्थानिकांना, खास करून वृद्ध लोकांना भरपूर त्रास होतो. रात्रभर चालणारा गोंगाट नकोसा वाटतो.
सांतिनेज परिसरात असलेल्या कामत आर्केड इमारतीच्या शेजारी नरकासुर करणाऱ्यांकडून मोठ्या आवाजात संगीत वाजवले जाते आणि यालाच कंटाळून एका स्थानिकाने मानवाधिकार आयोगाकडे यासंबंधी तक्रार केली होती.
तक्रार नोंदवून घेतल्यानंतर आयोगाने या संपूर्ण परिसराची पाहणी केली आणि कामात आर्केडच्या इमारतीपासून किमान २० मीटरच्या अंतरावर नरकासुराची मिरवणूक असावी तसेच दरम्यान वाजणारा आवाज हा मर्यादेत असावा असे आदेश देण्यात आलेत.
या आदेशांचे पालन केले जातेय की नाही यावर पोलिसांचे लक्ष असेल, नोव्हेंबर महिन्यात संबंधित अहवाल आयोगाला सादर करण्याचे आदेश मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष डेसमंड डीकोस्टा आणि सदस्य प्रमोद कामत यांनी दिले आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.