Goa Government School राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे कमी पटसंख्या असलेल्या शाळांच्या विलिनीकरणास प्रारंभ झाला आहे. मुरगाव व डिचोली तालुक्यांतून प्रत्येकी २ सरकारी प्राथमिक शाळांचे विलिनीकरण झाले आहे, तर साखळीतील एक शाळा विलिनीकरणाच्या मार्गावर असल्याची माहिती शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी दिली.
माध्यान्ह निविदा पाच हजारजणांसाठी
राज्यातील सुमारे १.६३ लाख विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहाराचा लाभ दिला जातो, त्यापैकी ५ हजार विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहार पुरवण्यासाठी निविदा काढली आहे.
या विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहार पुरवठा करण्यासाठी स्वयंसाहाय्य गटांना अडचणी येत असल्यानेच त्या विद्यार्थ्यांपुरताच हा निर्णय घेण्यात आला आहे आणि तो सरसकट सर्वच स्वयंसाहाय्य गटांसाठी नाही, असे स्पष्टीकरण शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी दिले.
कमी पटसंख्या असणाऱ्या शाळांमध्ये दोन शिक्षक देणे अशक्य आहे. नियमानुसार २५ विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक आणि २५ हून अधिक विद्यार्थी असतील तर दोन शिक्षक हवेत.
परंतु काही शाळांमध्ये २५ हूनही कमी विद्यार्थी असल्याने त्या शाळा जवळील शाळांमध्ये विलीन करण्याची योजना जाहीर झाली होती.
त्यानुसार आता मुरगाव व डिचोली तालुक्यांतील प्रत्येकी दोन सरकारी प्राथमिक शाळा विलीन केल्या आहेत.
विशेष म्हणजे, मुलांच्या पालकांनीच विलिनीकरणास मान्यता दिल्याने ती प्रक्रिया पार पडल्याचे झिंगडे यांनी सांगितले. साखळीतील एक शाळाही आता विलिनीकरणाच्या मार्गावर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, खोतिगावातील कुस्के येथील सरकारी प्राथमिक शाळेतील शिक्षक वेळेत येत नसल्याचे वृत्त हाती आले आहे. मुलांना सोडण्यासाठी येणाऱ्या पालकांनी शाळेतील शिक्षक वेळेत येत नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.