Calangute: पणजी अँटी नार्कोटिक सेल (अमली पदार्थ विरोधी पथक) ने आज, मंगळवारी कळंगुट येथे टाकलेल्या छाप्यातून सुमारे 2 लाख 55 हजार रूपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. कळंगुट येथील नाईकवाडो येथे ही कारवाई करण्यात आली.
यावेळी पोलिसांनी सध्या याच परिसरात राहणाऱ्या इम्रान खान (27) याला अटक केली आहे. तो मूळचा दिल्लीचा रहिवासी आहे. त्याच्याकडे 15 ग्राम कोकेन, 10 ग्रॅम मेथाम्फेटामाईन आणि 30 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.
या सर्व अमली पदार्थांची एकूण किंमत 2 लाख 55 हजार रूपये इतकी होते.
इम्रान खान याच्यावर पोलिसांची आधीपासूनच नजर होती. यापुर्वीही कळंगुट पोलिसांनी अमली पदार्थाच्या तस्करीप्रकरणात अटक केली होती. त्याच्यावर 2014 मध्ये NDPS अॅक्टनुसार एक गुन्हा दाखल झाला होता. तर 2022 मध्ये त्याच्यावर खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे.
याशिवाय सन 2020 मध्ये हणजुणे येथेही खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. सध्या तो जामिनावर बाहेर होता.
अमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून मंगळवारी पहाटे त्याला अटक केली. नाईकवाडो येथे तो अमली पदार्थांसाठी आला होता.
अँटी नार्कोटिक सेलचे पोलिस निरीक्षक साजित पिल्लई यांच्या देखरेखीखाली अँटी नार्कोटिक्स सेलच्या पोलिस उपनिरीक्षक प्रियांका गारोडी यांनी या पथकाचे नेतृत्व केले. या पथकात पोलिस कॉन्स्टेबल नितेश मुळगावकर, मंदार नाईक, संदेश वळवईकर, मकरंद घाडी, लक्ष्मण म्हामल, कुंदन पाटेकर यांचा समावेश होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.