Dengue In Goa: डेंग्‍यू, डॉक्टरांच्‍या हलगर्जीपणाने घेतला चिमुकल्‍या मुलीचा बळी

Dengue In Goa: नवेवाडेवासीयांचा आरोप : चिखली रुग्‍णालयावर धडक; विचारला जाब
Goa Dengue Cases
Goa Dengue CasesDainik Gomantak
Published on
Updated on

Dengue In Goa: चिखली उपजिल्हा रुग्णालयात वाणी खानापूर (रा. नवेवाडे-वास्को) या ६ वर्षीय मुलीचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला.

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे तिचा मृत्यू झाल्याच्या आरोपावरून संतप्‍त नागरिकांनी डॉक्टरांना घेराव घालून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्‍याची मागणी केली.

Goa Dengue Cases
Dona Paula Jetty: दोनापावला जेटी बनतेय ‘पार्टी डेस्टिनेशन’

मिळालेल्या माहितीनुसार, नवेवाडे येथे श्री दुर्गामाता मंदिराजवळ राहणाऱ्या वाणी हिला काल सोमवारी संध्याकाळी 5 वाजता डेंग्यूसदृश तापामुळे चिखली उपजिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले होते.

रात्री दोन वाजता तिचा रक्तदाब अचानक कमी झाल्याने ती थंड पडली. याबाबत तिच्‍या पालकांनी ड्युटीवर असलेल्या नर्सेसना माहिती दिली. मात्र तेथे डॉक्टर उपस्थित नसल्याने

तिची तपासणी करण्यास वेळ गेला. तीन तास तसेच निघून गेले. सकाळी ६ वाजता त्या मुलीला बांबोळी येथील गोमेकॉत हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी तिच्या पालकांना दिला. त्‍यात आणखी खूप वेळ गेला.

तातडीने वाणीला गोमेकॉत हलविण्‍यात आले. तेथे तिचा रक्तदाब आणखी कमी झाला व आज मंगळवारी सकाळी 9 वाजता उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. या मुलीचा मृत्यू झाल्याची बातमी नवेवाडे येथे कळताच नवेवाडे येथील संतप्त नागरिकांनी आज सकाळी चिखली रुग्णालयात येऊन डॉक्टर व कर्मचान्यांना घेराव घातला व जाब विचारला.

यावेळी वातावरण बरेच तंग बनले होते. वास्को पोलिसांना याची माहिती देताच त्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन स्‍थिती नियंत्रणात आणली. मात्र नागरिकांनी संबंधित डॉक्टर व नर्सेसवर कारवाई करण्याची मागणी लावून धरली.

दरम्‍यान, चिखली उपजिल्हा इस्पितळात कोविड काळात तैनात केलेल्या 18 नर्सेस अजून तेथे सरकारी पाहुणाचार घेत आहेत. आरोग्य संचालकांनी याची दखल घेऊन त्यांची इतरत्र बदली करावी अशी मागणी होत आहे.

Goa Dengue Cases
Goa Politics: गावडेंबाबत गैरसमज पसरविणारे ‘ते’ कोण?

आज दुपारी 1 वाजता बोगदा येथील स्मशानभूमीत वाणी खानापूर या चिमुकल्‍या मुलीवर शोकाकूल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले.

तिचे वडील नवेवाडे येथे बसवर कंडक्टर म्हणून काम करतात, तर आई घरकाम करून संसाराला हातभार लावते. वाणी ही त्‍यांची एकुलती एक मुलगी होती.

आणखी दोन मुलींना डेंग्‍यू

नवेवाडे-वास्‍को परिसरात आज आणखी दोन लहान मुलींना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्‍यातील एक मुलगी 7 तर दुसरी 9 वर्षांची आहे. वरील दोन्ही मुलींना उपचारांसाठी चिखली इस्पितळात आणण्यात आले होते.

पण, डॉक्टर त्यांना दाखल करून घेण्यास तयार नव्हते. या दोन्ही मुलींच्‍या माता आपल्‍या मुलींसह सुमारे दोन-अडीच तास इस्पितळाबाहेर उभ्‍या होत्‍या. नागरिकांनी जेव्हा आवाज उठविला तेव्हा त्या मुलींना इस्पितळात दाखल करून घेण्यात आले.

मडगाव पालिकेतील 15 कर्मचारी बाधित

मडगाव नगरपालिकेत डेंग्यूचा शिरकाव झाला असून पालिकेतील सुमारे 15 कर्मचाऱ्यांना डेंग्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पालिकेत गेल्या आठ दिवसांपासून अनेक कर्मचारी गैरहजर आहेत.

याचा परिणाम प्रशासकीय कामावर होत असून, अनेक कामे खोळंबली आहेत. गेल्या आठ दिवसांपासून नगरपालिकेत अनेक कर्मचारी गैरहजर असल्याने पालिकेची अनेक प्रशासकीय कामे रखडली आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com