Drishti Marine: समुद्रात बुडणाऱ्या चौघांना जीवरक्षकांकडून जीवदान, दृष्टी मरीनची कामगिरी; दोन बेपत्ता मुलांना काढले शोधून

Drishti Marine rescue: दृष्टी मरीनच्या प्रशिक्षित जीवरक्षकांनी या आठवड्यात समुद्रकिनाऱ्यांवर तामिळनाडूतील आई-मुलासह चार पर्यटकांना बुडण्यापासून वाचवले
Drishti Marine
Drishti MarineDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: दृष्टी मरीनच्या प्रशिक्षित जीवरक्षकांनी या आठवड्यात समुद्रकिनाऱ्यांवर तामिळनाडूतील आई-मुलासह चार पर्यटकांना बुडण्यापासून वाचवले, तसेच बेपत्ता झालेल्या दोन लहान मुलांना शोधून काढून त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले.

५ मित्रांसह तेलंगणातील २२ वर्षीय युवक समुद्रात उतरला होता. नशेत असल्याने तो बुडू लागल्याचे पाहताच त्याला जीवरक्षक विष्णू कुबल आणि मनोज परब यांनी तातडीने सर्फबोर्ड आणि रेस्क्यू ट्यूबचा वापर करून मदत केली.

त्यानंतर जेट स्कीच्या साहाय्याने त्याला किनाऱ्यावर आणले. दुसऱ्या घटनेत तामिळनाडूतील आई आणि तिचा १० वर्षांचा मुलगा मांद्रे येथे समुद्रात पोहत असता त्यांना किनाऱ्यावर परतणे अशक्य झाले.

Drishti Marine
Luthra Brothers Arrived In Goa: बर्च बाय रोमिओ लेनचे मालक लुथरा बंधू अखेर गोव्यात दाखल, सर्वत्र कडक पोलिस बंदोबस्त

जीवरक्षक दत्तगुरू यांनी रेस्क्यू बोर्ड आणि जेट स्कीवरील सुधीर परब यांच्या मदतीने दोघांनाही सुखरूप वाचवले. पुण्याहून आलेले ५ वर्षांचे एक मूल बेपत्ता झाल्याची तक्रार पालकांनी केली. नंतर जीवरक्षकांनी काही वेळातच त्या मुलाला शोधून काढले आणि मुलाला पालकांच्या स्वाधीन केले. पाळोळे किनाऱ्यावर ७८ वर्षांची विदेशी पर्यटक महिला पाण्याच्या प्रवाहात (रिप करंट) ओढली जात होती.

Drishti Marine
Goa Assembly Winter Session 2026: विधानसभेचे हिवाळी अधिवेशन हडफडे अग्निकांडामुळे तापणार? 12 ते 16 जानेवारीपर्यंत चालणार कामकाज

जीवरक्षक दिनेश वेळीप यांनी धाव घेत त्यांना सुरक्षितपणे किनाऱ्यावर आणले. याच किनाऱ्यावर बंगळुरूची ३ वर्षांची मुलगी देखील बेपत्ता झाली होती. जीवरक्षकांनी दहा मिनिटांत तिला शोधून काढले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com