Dragonfly In Goa: गोव्यात चतुरांच्या प्रजातींमध्ये वाढ! रिसर्चमधून खुलासा; संवर्धनाची गरज

Goa Hidden Gems: अलीकडेच गोव्यात चतुर (ड्रॅगनफ्लाय)च्या काही नवीन प्रजाती समोर आल्या आहेत
Goa Hidden Gems: अलीकडेच गोव्यात ड्रॅगनफ्लायच्या काही नवीन प्रजाती समोर आल्या आहेत
Dragonfly In GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Dragonfly Hidden Species in Goa

अलीकडेच पराग रांगणेकर यांनी केलेल्या सर्वेक्षणाच्या अनुसार गोवा हे १०८ चतुर (ड्रॅगनफ्लाय)च्या प्रजातींचे घर असल्याचे निदर्शनास आले, मात्र अधिकृतरीत्या गोवा हे ९६ चतुर (ड्रॅगनफ्लाय)च्या प्रजातींचे घर असल्याची नोंद आहे. निसर्गवादी पराग रांगणेकर WWF-India च्या सहकार्याने या जिवांचे दस्तऐवजीकरण आणि संवर्धन करण्याचा प्रयत्न करीत आहे.

Goa Hidden Gems: अलीकडेच गोव्यात ड्रॅगनफ्लायच्या काही नवीन प्रजाती समोर आल्या आहेत
Sindhudurg illegal Sand Transportation: सिंधुदुर्गातून बेकायदा रेती वाहतूक, गोव्याचा महसूल बुडाला?

पराग रांगणेकर यांच्या मतानुसार राज्यात या प्रजातीबद्दल आणखीन संशोधन करण्याची गरज आहे, मात्र त्यांना या कामासाठी हवं तसं मनुष्यबळ मिळालेलं नाही. पराग रांगणेकर असेही सांगतात की वेगवेगळ्या वातावरणाला अनुसरून या प्रजातींचा शोध घेता येऊ शकतो. जास्तीत जास्त लोकांनी चतुर (ड्रॅगनफ्लाय)च्या प्रजातींबद्दल जाणून घ्यावं म्हणून ड्रॅगनफ्लाय फेस्टिव्हल गोव्यासह भारतातील 13 राज्यांमध्ये सुरू करण्यात आला आहे.

पैकी येत्या डिसेंबर महिन्यात पराग आणि WWF-India यांच्या मदतीने गोव्यातील झुऑलॉजीचे विद्यार्थी आणि १३ व्हॉलंटियर्स एकत्र येऊन नंदा आणि करमाळीच्या तलावावर अशा प्रजातींवर अभ्यास करून एक रिपोर्ट तयार करणार आहेत. चतुर (ड्रॅगनफ्लाय) हे गोव्यातील अनेक अपरिचित घटकांपैकी एक आहे आणि अशा अभ्यासामधून त्यांची माहिती जगासमोर येण्याची अपेक्षा केली जाऊ शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com