Sindhudurg illegal Sand Transportation: सिंधुदुर्गातून बेकायदा रेती वाहतूक, गोव्याचा महसूल बुडाला?

illegal Sand Trade Goa Border: सिंधुदुर्गातून अनेक ट्रक परवाना व कागदपत्रांशिवाय रेती वाहतूक करत असल्याने राज्याचा महसूल बुडत असल्याचा आरोप समाज कार्यकर्ते संजय बर्डे यांनी केला आहे.
Sand Mining
Sand MiningDainik Gomantak
Published on
Updated on

Sindhudurg/Goa News: नदीतून रेती काढण्यावर सरकारने बंदी घातल्यामुळे येथील रेती व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत आहे. दुसऱ्या बाजूने सिंधुदुर्गातून अनेक ट्रक परवाना व कागदपत्रांशिवाय रेती वाहतूक करत असल्याने राज्याचा महसूल बुडत असल्याचा आरोप समाज कार्यकर्ते संजय बर्डे यांनी केला आहे.

पत्रादेवी येथील तपासणी नाक्यावर अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयात तपासणीसाठी आवश्यक सोयी सुविधा नसल्याने अन्य राज्यांतून येणाऱ्या मासळीची तपासणी योग्य रित्या होत नसल्याने राज्यातील लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. पत्रादेवी येथील तपासणी नाक्यावर काही वाहने थांबवून त्यांच्याकडील कागदपत्रांची पाहणी केल्यानंतर त्यांनी ही बाब पत्रकारांच्या निदर्शनास आणून दिली.

Sand Mining
Sand Mining: गोव्यात बांधकामांना आता 'अच्छे दिन' 'मांडवी', 'झुआरी'त रेती उपशास मुभा; दरावरही येणार नियंत्रण

खाण व्यवसायाने संकेतस्थळ जारी केले असले, तरी ते बंद आहे. त्याचा फायदा सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून येणाऱ्या रेती ट्रकचालकांना होतो. त्यामुळे हे संकेतस्थळ मुद्दाम बंद केले असावे, असा संशयही बर्डे यांनी व्यक्त केला. सिंधुदुर्गमधील काही रेती व्यावसायिकांशी राज्यातील काही राजकारण्यांचे साटेलोटे असून एक महिला हप्ते गोळा करून नेते, असा आरोपही त्यांनी केला.

पत्रादेवी तपासणी नाक्यावरून अनेक वाहने बेदरकारपणे धावतात. हल्लीच एक ट्रक घरावर पलटी होणार होता. मात्र, ही दुर्घटना टळली. येथील कर्मचाऱ्यांना जीवावर उदार होऊन काम करावे लागते. याचा विचार करून या ठिकाणी स्पीड ब्रेकर उभारावेत, असे संजय बर्डे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com