
पणजी: राजर्षी शाहू महाराज हे सयाजीराव गायकवाड यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना शिष्यवृत्ती मिळावी म्हणून पत्रव्यवहार करतात, शिवाय त्यांना परदेशात शिक्षणासाठी पाठवतात, अशा छत्रपती शाहू महाराजांचा खरा हिंदू धर्म होता. कारण त्यांनी कोणतीही मदत जात-पात न पाहता केली होती, परंतु गोव्यात डॉ. आंबेडकरांचे भवन बांधण्यासाठी येथील भाजप सरकार राजकारण करीत आहे, अशी टीका गोवा प्रभारी डॉ. अंजली निंबाळकर यांनी केली.
इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा संस्थेच्या सभागृहात काँग्रेसच्यावतीने सोमवारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, खासदार विरियातो फर्नांडिस, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार कार्लोस फेरेरा, आमदार एल्टन डिकॉस्ता, माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप, महिला प्रदेश काँग्रेस (Congress) अध्यक्ष प्रतीक्षा खलप, त्याचबरोबर इतर पदाधिकारी उपस्थित होते.
डॉ. निंबाळकर म्हणाल्या, केंद्रीय अर्थसंकल्प पहा, भाजप सरकारने एसटी-एससी समाजाच्या आर्थिक तरतुदीत कपात केली आहे. यावरून डॉ. आंबेडकरांवर तुमचे प्रेम हेच आहे का? असा सवाल त्यांनी केला. भाजपवाल्यांना हिंदू धर्म म्हणजे भगवा आणि त्यापलिकडे काहीच दिसत नाही. शाहू-फुले-आंबेडकर यांचे साहित्य ज्यांनी वाचले, ते लोक कधीच धर्माच्या कचाट्यात अडकणार नाही. येथील सरकारला आंबेडकर भवनासाठी पैसे देता येत नाहीत, हे अपयश आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे उच्चशिक्षण आणि त्यांनी जीवनात घेतलेल्या त्रासावर प्रकाश टाकत युरी म्हणाले, ते खरोखरच ध्येयवादी होते. देशाला त्यांनी राज्यघटनेच्या माध्यमातून दिलेली दिशा ही प्रगतीकडे नेणारी आहे. आम्ही प्रत्येक विधानसभा अधिवेशनात आंबेडकर भवनाची मागणी करीत आलो आहोत. आता मुख्यमंत्र्यांनी भवनाविषयी जे आश्वासन दिले आहे, त्यावरून ते किती गंभीर आहेत हे दिसून येते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.