Dona Paula Jetty
Dona Paula JettyDainik Gomantak

Donapaula Jetty: दोना पावला जेटीचे काम पूर्ण; एक डिसेंबरला होणार सुरू

पर्यटनात कोणतेही अडथळे नकोत यासाठी आम्ही काम करत आहोत.
Published on

Donapaula Jetty: अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या दोना पावला जेटीचे (Donapaula Jetty) काम पूर्ण झाले असून, येत्या एक डिसेंबरला जेटी सुरू होणार आहे. अशी माहिती पर्यटनमंत्री रोहन खंवटे (Tourism Minister Rohan Khaunte) यांनी दिली. तसेच, डिसेंबरमध्ये होणाऱ्या सनबर्न फेस्टिव्हलमध्ये (Goa Sunburn Festival) गोमंतकीयांना योग्य व्यासपीठ मिळेल असे आश्वासन देखील खंवटे यांनी यावेळी दिले.

Dona Paula Jetty
Goa Government: 'सौझा लोबो बार' बाबत वारंवार सतावणूक- जुआन लोबो

पणजीतील पर्यटन सुविधा वाढवण्याबाबत पणजीचे आमदार व कामगार मंत्री बाबूश मोन्सेरात, पर्यटनमंत्री रोहन खंवटे आणि अधिकारी यांच्यात आज एक बैठक पार पडली. याबैठकीनंतर खंवटे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. खवंटे म्हणाले, राज्यातील सर्व बेकायदा प्रकार थांबायला हवेत, त्यासाठी आम्ही काम करत आहोत. बेकायदेशीर कामांना प्रोत्साहन देणारे तसेच, बेकायदेशीर काम करणाऱ्यांविरोधात कारवाई करावीच लागेल. पर्यटनात कोणतेही अडथळे नकोत यासाठी आम्ही काम करत आहोत.

Dona Paula Jetty
Goa News: म्हापशातील कोमुनिदाद प्रशासक इमारत नादुरुस्त

येत्या डिसेंबरमध्ये सनबर्नचे आयोजन केले आहे. या सनबर्नमध्ये गोमंतकीयांना योग्य व्यासपीठ मिळेल असेही खवंटे यांनी यावेळी सांगितले. शॅक शूल्क संबधितचा शॅक मालकांचा मुद्या मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासमोर मांडला आहे. शूल्क कमी करण्याचा निर्णय आज किंवा उद्या घेतला जाईल असे खवंटे म्हणाले. तर, दोना पावला जेटीचे काम पूर्ण झाले असून, एक डिसेंबरला ती सुरू होणार असल्याचे खवंटे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com