Goa News
Goa NewsDainik Gomantak

Goa News: म्हापशातील कोमुनिदाद प्रशासक इमारत नादुरुस्त

Goa News: पोर्तुगीजकालीन बांधकामांकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत आहे.

Goa News: म्हापसा येथील कोमुनिदादच्या प्रशासक वारसा इमारत सध्या दुरुस्ती आणि नूतनीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. अनेक वर्षांपासून या बांधकामाकडे दुर्लक्ष केले गेले असून या इमारतीचे रंगकाम सुद्धा केलेले नाही. याशिवाय कार्यालयात कर्मचाऱ्यांची कमतरता आहे.

म्हापसा कोर्ट जंक्शनवर असलेल्या या प्रशासकीय इमारतीला ‘अ‍ॅडमिनीस्ट्रीट ऑफ कोमुनिदाद दी बार्देश’ या नावानेही ओळखले जाते. या इमारतीला सध्या तातडीने दुरुस्ती व नूतनीकरण करण्याची गरज आहे. या इमारतीला वारसा मूल्य आहे.

Goa News
Goa Government: पुढच्या वर्षापासून नवीन शॅक धोरण आणणार- रोहन खंवटे

त्यामुळे त्याचे जतन करणे आवश्यक आहे. ही रचना जुनी पोर्तुगीज काळातील इमारत असून ती 1300 चौरस मीटर क्षेत्रफळात पसरलेली आहे आणि त्यात अनेक खोल्या, एक गॅलरी आणि एक सभागृह आहे.

भिंतींना तडे गेल्याने तसेच छताचे सिमेंट खाली पडत असल्याने आतमधील लोखंडी सळ्याही बाहेर दिसताहेत. त्याशिवाय लाकडी छतही खराब झाले आहे. देखभालीअभावी सध्या इमारतीची स्थिती कालांतराने खालावत चालली आहे.

उत्तर गोव्याचे प्रशासक-

  • उत्तर गोवा कोमुनिदाद प्रशासनाकडे कर्मचाऱ्यांच्या कमतरतेचा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे कार्यालयाच्या कामकाजावर परिणाम होत आहे. शिवाय विद्यमान कर्मचाऱ्यांवर कामाचा भार जास्त. तसेच कार्यालयाला स्वतःची वाहने मिळालेली नाहीत.

Goa News
Mapusa Municipality: म्हापशात साफसफाई अभावी साचला कचऱ्याचा ढिगारा!
  • उत्तर गोव्याचे प्रशासक कार्यालय आहे. या ठिकाणी उसगावसह उत्तर गोव्यातील ७५ कोमुनिदाद हाताळत असूनही कार्यालयात पुरेसे कर्मचारी नसल्यामुळे दैनंदिन कामावर परिणाम. परिणामी, अर्ज निकाली काढण्यास विलंब.

  • कोमुनिदादसंदर्भात सरासरी सुमारे 50 ते 60 तक्रारी प्राप्त होतात. याशिवाय कार्यालयात अद्ययावत संगणक आणि हे संगणक हाताळण्यासाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्याचा अभाव.

इमारतीकडे 2018 पासून दुर्लक्ष: 2018 पासून दिवसेंदिवस खराब होत असलेल्या इमारतींच्या दुरुस्तीबाबत कोमुनिदादच्या प्रशासक कार्यालयाने सरकारकडे पत्रव्यवहार केला आहे. उत्तर गोवा कोमुनिदादचे प्रशासक शिवप्रसाद नाईक म्हणाले, आमचे कार्यालय या इमारतीची जीर्णस्थिती व दुरुस्तीबाबत सरकारच्या संपर्कात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com