'गंभीर गुन्हे दाखल असलेल्या उमेदवारांना तिकीट नको'

काँग्रेस खासदार फ्रान्सिस्को सार्दिन यांचं गोव्यातील राजकीय पक्षांना आवाहन
Francisco Sardinha
Francisco SardinhaDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: आगामी काळात होणाऱ्या गोवा विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर गोव्यात प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. अशातच असोसिएशन ऑन डेमोक्रेटिक रिफॉर्म (एडीआर) या स्वयंसेवी संस्थेने दिलेल्या माहितीनुसार राज्यात सध्या 11 आमदारांवर (MLA) गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना काँग्रेसचे खासदार फ्रान्सिस्को सार्दिन म्हणाले, "सर्व राजकीय पक्षांनी गंभीर गुन्हे दाखल असलेल्या उमेदवारांना तिकीट देणे टाळावे.

Francisco Sardinha
'आप'चा गोव्यातील 'स्ट्रॅटेजिक मास्टरस्ट्रोक' भाजप आणि काँग्रेसला धक्का देणार?

सार्दिन यांनी रेजिनाल्ड लॉरेन्स आणि मोरेनो रेबेलो यांच्यावरही भाष्य केले. ते म्हणाले, "मोरेनो निवडून आले तर भाजपसोबत (BJP) जाणार नाहीत याची काय हमी आहे. मला आणि माझ्या मुलगा सलोमलाही कुडतरी मधून निवडणूक लढवण्याची ऑफर आली होती. लोकांना नवा चेहरा आणि प्रामाणिक नेता हवा आहे. मला विधानसभा निवडणूक लढवण्यात रस नाही पण माझ्या मुलाचे नाव 'शॉर्टलिस्ट' करण्यात आले आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

सार्दिन पुढे म्हणाले, "फक्त काँग्रेसच (Congress) गोव्याचे रक्षण करू शकतो. गोव्याच्या विकासासाठी आपल्याला प्रामाणिक नेत्यांची गरज आहे. राजकीय पक्षांनी गंभीर गुन्हे दाखल असलेल्या उमेदवारांना तिकीट देणे टाळावे. सर्वच पक्षांनी याकडे लक्ष द्यावे."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

42 Percent Cooperative Societies Closed
PM Matsya Sampada Yojana Goa
NEP Implementation In Goa
Yuri Alemao Opposition Criticism
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com